रु. 350 चे 560 का झाले?
ठाण्याच्या साहित्य संमेलनात ‘चिन्ह’नं ‘नग्नताः चित्रातली आणि मनातली’ अंकाची माहितीपत्रकं वितरीत केली तेव्हा जवळ जवळ तीनशे-चारशे जणांनी मोठ्या उत्साहानं अंकासाठी नावं नोंदवली. तेव्हा अंकाचं देणगीमूल्य होतं रु. 250 आणि सवलतीत तो अंक दिला जाणार होता अवघ्या 200 रुपयांना. पण मोठ्या संख्येनं नाव नोंदणी करणार्यांचा उत्साह त्यानंतरच्या चारच महिन्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाला. अवघ्या काही जणांनीच दिलेल्या मुदतीत ते सवलत शुल्क भरण्याची तत्परता दाखवली.
अंकाचं काम मार्गी लागल्यावर असं लक्षात आलं की हा अंक मोठा मोठा होत चाललाय. याचं देणगीमूल्य वाढवावं लागणार! आणि मग रंगीत माहितीपत्रक प्रसिद्ध झालं तेव्हा अंकाचं देणगीमूल्य रु. 300 करण्यात आलं. रंगीत माहितीपत्रक, फेसबुक, संकेतस्थळ या सार्यांमुळे अंकाची मागणी भराभर वाढू लागली. इकडे अंक मोठा मोठा होतच चालला होत. पण यानंतर देणगीशुल्क वाढवायचे नाही असा निर्णय आम्ही ठामपणानं घेतला होता. अगदी प्रकाशनाच्या 20-25 दिवस आधी सुद्धा आम्ही मागणी नोंदवून घेत होतो.
त्यामुळे झालं काय की या अंकाची पहिली आवृत्ती मोबाईल आणि नेटवरूनच बुक झाली. ‘चिन्ह’च्या आजवरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा, सर्वात जास्त खर्चाचा आणि सर्वात अधिक स्फोटक विषयावरचा अंक असल्यानं आम्हीही थोडसं सबूरीनं घ्यायचं ठरवलं आणि जी मागणी नोंदवली गेली होती त्यावर आधारित प्रिन्ट ऑर्डर निश्चित करून अंकाची छपाई सुरू केली. कारण अंकाच्या निर्मितीच्या काळात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे या अंकाचं स्वागत कसं होईल? समाजात नेमकी काय प्रतिक्रिया उमटेल? या विषयी मनात अनेक शंका कुशंका नाचत होत्या. त्यातूनच हा अंक मर्यादित किंवा मागणीनुसार प्रिन्ट ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला गेला.
याला दुसरं कारण काहीसं आर्थिकही होतं. जे 250 रु. किंवा 300 रु. सवलत देणगीमूल्य आम्ही आकारलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च अंकाच्या एका प्रतीला आम्हाला येत होता. पण महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकारांनी दिलेल्या जाहिरात प्रायोजकत्वामुळे तो खर्च आम्ही सहन करू शकत होतो. आणि तो आम्ही केलाही. कुठल्याच आर्थिक फायद्यातोट्याकडे न पाहता आम्ही दिलेला शब्द पाळणं महत्त्वाचं मानलं. ज्या अंकाच्या एका प्रतीला 300 रुपयांपेक्षाही अधिक खर्च आला, ती प्रत ज्या वाचक सभासदानं सवलत देणगीशुल्क रु. 200 (अगदी सुरूवातीला) आणि रु. 250 (नंतर) ज्यांनी ज्यांनी भरली त्या सार्यांनाच त्याच सवलतशुल्कात ‘चिन्ह’नं अंक उपलब्ध करून दिला. पुन्हा एकदा थॅंक्स टू महाराष्ट्रातील सर्वच चित्र आणि शिल्पकार.)
आता सारं काही इथंच थांबायला हवं होतं किंवा संपायला हवं होतं पण तसं झालं नाही कारण अचानक वृत्तपत्रात येणार्या बातम्यांमुळे म्हणा, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सतीश नाईक यांच्या लेखामुळे म्हणा किंवा ‘लोकमत’मधल्या शर्मिला फडके यांच्या लेखाच्या पूर्वप्रसिद्धीमुळे म्हणा, ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला मोठ्या प्रमाणावर हिट्स मिळू लागल्या आणि अंकाविषयी विचारणा होऊ लागली. तोपर्यंत अंकाची छपाई सुरूही झाली होती. त्यामुळे प्रिन्ट ऑर्डर वाढवता येणं अशक्य होतं, त्यातूनच मग दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याची कल्पना पुढे आली. (‘चिन्ह’च्या आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं.) महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकारांनी उचललेल्या जाहिरात प्रायोजकत्व योजनेतील बराचसा भाग पहिल्या आवृत्तीवर खर्च झाल्यानंच दुसर्या आवृत्तीचं देणगीमूल्य वाढवणं क्रमप्राप्त होतं. देणगीमूल्य रु. 350 रुपयांवरून 560 रुपयांवर जे गेलं ते कसं गेलं ते यावरून लक्षात यावयास हरकत नाही.
दुसर्या कुण्या व्यावसायिक प्रकाशकानं ही अशी निर्मिती केली असती तर त्यानं एका प्रतीची किंमत रु.1000 इतकी निश्चितपणानं आकारली असती. पण ‘चिन्ह’चं उद्दिष्टच वेगळं असल्यानं ‘चिन्ह’नं तो मार्ग चोखाळला नाही. मोबाईल वा नेटवरून थेट बुकींग करण्याच्या या नव्या फंड्यामुळे एक झालं. पुस्तक विक्रेते किंवा मासिकं विक्रेते जे 30 ते 40% कमीशन आकारतात त्यामधून वाचकांची आणि अर्थातच ‘चिन्ह’चीही सुटका झाली. अंकाचं देणगीमूल्य फक्त रु. 750 इतकं ठेवता आलं आणि सवलतीत तो 560 रुपयांना उपलब्ध करून देता आला. प्रायोजकत्व योजनेतून मिळालेला सर्वच निधी आम्ही या अंकाच्या पहिल्या अंकाला संपूर्ण तर दुसर्या आवृत्तीला काही प्रमाणात वापरला असल्यानं आता या अंकाची तिसरी किंवा चौथी आवृत्ती प्रसिद्ध करायची वेळ आलीच (आणि ती येणारही आहे) तर तेव्हा अंकाचं देणगीमूल्य रु. 750 असेल हे निश्चित.
‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरून आपण या अंकाची मागणी नोंदवू शकता किंवा 99677 84422 / 90040 34903 / 98331 11518 या ‘चिन्ह’च्या मोबाईल नंबर्सवर ‘1 m copy’ एवढाच मेसेज स्वतःच्या नावपत्त्यासह पाठवून आपली मागणी नोंदवू शकता.
देणगीमूल्याचे रु. 560 आपण मुंबईतले असाल किंवा आपलं खातं राष्ट्रीयकृत बॅंकेत असेल तर आपण कुरियरनं धनादेशही पाठवू शकता किंवा ‘चिन्ह’च्या स्टेट बॅंकेच्या खात्यावर आपण आपला धनादेश जमा करू शकता अथवा स्टेट बॅंकेच्याच खात्यावर रोख रक्कमही भरू शकता.
ज्या पद्धतीनं आपण देणगीशुल्क द्याल त्याविषयी ‘चिन्ह’ला एस. एम. एसद्वारे किंव फोन करून कळवणं मात्र अत्यावश्यक आहे. अन्यथा आपले पैसे नावाविना खात्यात पडून रहाणं शक्य आहे.
आजच निर्णय घ्या. दुसर्या आवृत्तीच्याही आता थोड्याच प्रती उपलब्ध आहेत.
या अंकाविषयीच्या माहितीपत्रकांसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf
आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 9967784422 / 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy' एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.
No comments:
Post a Comment