Sunday, April 24, 2011

ओलेती ते सरस्वती.....



१९२६ साली 'रत्नाकर' मासिकाच्या मुखपृष्ठावर ठाकुरसिंगांचे 'ओलेती' हे चित्र झळकले आणि समाजात खळबळ माजली. वादांचा गदारोळ माजला. चित्राच्या अश्लिलतेविरोधात न्यायालयात खटले दाखल केले गेले. आज नव्या सहस्त्रकातही कलेतल्या श्लिल-अश्लिल वादाला उत्तर मिळालेले नाही. आजही न्यायालयात असे अनेक खटले दाखल होत रहातात. 'ओलेती'च्या जागी आता 'सरस्वती' असते. शिवाय वाद केवळ श्लिल-अश्लिलतेपुरताच मर्यादित रहात नाही तर त्याला जातीयतेचे, धार्मिकतेचे अनेक कंगोरे फुटतात. चित्रकारावर देशातून परागंदा व्हायची वेळ येते.

चित्रकार हुसेन यांनी हिंदूंच्या देव देवतांचं केलेलं चित्रण अश्‍लिल आहे काय?
हुसेन यांना असं चित्रण करण्याचा अधिकार कोणी दिला?
हुसेन हे हिंदूव्देष्टे आहेत काय?
अश्‍लिलता म्हणजे तरी नेमकं काय?
अर्वाचीन - प्राचीन काळात देवालयं, गुंफा, लेण्यांमध्ये जे चित्रण झालं ते काय अश्‍लिल नव्हतं?
मग त्याला काय म्हणायचं?
एक ना दोन, नाना प्रश्‍न प्रत्येकालाच पदोपदी सतावत असतात.
पण त्या प्रश्‍नांची उत्तर प्रत्येकाला मिळवता येतातच असं नाही.
किंवा मिळालेली उत्तर चूक का बरोबर ते ताडून पहावयासाठी जे करावं लागतं ते प्रत्येकापाशी असतंच असं नाही.

विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत यांचं मात्र तसं नसतं
किंबहुना तेच तर वेळोवेळी समाजाला दिशा देत असतात. विचार देत असतात, मार्ग दाखवत असतात. म्हणूनच मग आम्ही ठरवलं. त्यांनाच सारंच्या सारं विचारायचं.
अनेकांनी विषयाचा आवाका पाहून नको नको म्हटलं.
ज्यांना थेट नाही असं म्हणता आलं त्यांनी टंगव टंगव टंगवलं.
पण ज्यांनी होकार दिला त्यांनी मात्र संपूर्ण सहकार्य दिलं.
त्यातूनच साकार झाला एक परिसंवाद.’’नग्नता :चित्रातली आणि मनातली व कलावंतांचं स्वातंत्र्य’’
ज्यात सहभागी झाले आहेत
चित्रकार अकबर पदमसी, सुधीर पटवर्धन, संजीव खांडेकर, साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, प्रतिभा रानडे, कविता महाजन, नृत्यांगना पार्वती दत्ता, मनोविकारतज्ज्ञ व लेखक डॉ आनंद नाडकर्णी आणि सेक्सॉलॉजीस्ट डॉ. प्रकाश कोठारी.


पण त्या आधी अंक बुक करायला विसरु नका.
http://chinha.in/english/booknow.php या लिंकवर.
पुन्हा इथंच भेटू.
भेटतच राहू.


शर्मिला फडके

4 comments:

  1. ठाकूर सिंगांचे ओलेती हे चित्र बारकाईने बघितले असेल तर मला ते चित्र एका पुरुषाचे वाटते किंवा कदाचित एका अंगापिंडाने मजबूत असलेल्या बाईचे असेल ही. तुम्हाला काय वाटते?
    दुसरे म्हणजे हुसेन हे कलाकार म्हणून मोठे होते असतील पण त्यांना कुठल्याच धर्माच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही. त्यांनी काढलेल्या मुसलमान स्त्रियांना कधीच नग्न अथवा कमी कपड्यात दाखवले नाही फक्त हिंदू देवी देवतानाच नग्न काढले आहे. आपल्या कुठल्याच पुस्तकात किंवा कोण्या चित्रकाराने आपल्या देवतांना नग्न काढले नाही. फक्त हुसेन ह्यांनीच आपली कल्पना शक्ती नको तेथे चालवली आहे.अगदी गरज नसताना. !
    हुसेन चित्रकार होता माणूस कधीच नाही !!!
    कदाचित हे माझे वैयक्तिक मत ही असेल.

    ReplyDelete
  2. this painting is i a awesome work of Thakur Singh.
    i love this painting ... i dont get why people only saw nudity in this painting ...this painting saying something more than that...the awesome use of color and something that i cant express in words.
    hates of to Thakur Singh.

    ReplyDelete
  3. barobar...mala pan prashna padto ki husain ase waglech kase. vyaktiswatantrya kala abhvyakti manun kuni apala aai wadlanna rikamya canwaswar nagna dakhawnar nahi....kiti swatantra ghyacha he pratekane pratekacha sarasar buddhicha wechar karun tharwaicha asta.....hussain ak murkha manus ahe...jyane parmeshwarachi awahelnach keli...dhikkar aso ashya manovrutticha....

    ReplyDelete