’महाराष्ट्र टाईम्स’च्या दि.२८ मार्च १९६९च्या अंकात आजचे नामवंत चित्रकार प्रभाकर कोलते यांनी प्रख्यात चित्रकार एम.एफ़.हुसेन यांच्या जहांगीर आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनावर अत्यंत परखड टीका करणारं एक लेखन केलं, ते वाचून हुसेन संतापले. त्यांनी थेट संपादकांकडेच तक्रार केली. संपादक म्हणजे कोण तर ... गोविंदराव तळवलकर. दुस-या दिवसापास्न कोलते यांचं मटामधलं सदर लेखन अर्थातच थांबलं, हे वेगळं सांगायला नकोच.
तेच प्रभाकर कोलते हे आज भारतातले एक ख्यातनाम कलाकार म्हणून ओळखले जातात. आणि आज २०११ साली, म्हणजे तब्बल ४२ वर्षांनंतर त्याच हुसेन यांनी त्यांच्या वरच्या इंग्रजी पुस्तकासाठी प्रकाशकाला लेखक म्हणून प्रभाकर कोलते यांचंच नाव सुचवलं आहे. आहे की नाही गंमत!
नुकतंच कोलते यांनी ते पुस्तक लिहून हातावेगळंही केलंय. म्हणूनच ’चिन्ह’नं कोलते यांना बोलतं करायचं ठरवलं. त्यात आणखीही दोन-तीन हेतू होते.
एक: त्या पुस्तकात काय आहे हे समजून घ्यायचं होतं. दोन: हुसेन यांच्या आजवरच्या कला कारकीर्दीकडे कोलते कसं पहातात? ते जाणून घ्यायचं होतं. आणि तीन: हुसेन यांना भारतातून परांगदा व्हावं लागलं या घटनेकडे ते कसं पहातात? चित्रकार कसं पहातात? सारं कलावर्तुळ कसं पहातं? हे ही उमजून घ्यायचं होतं.
हुसेन यांच्या संदर्भात तुम्हा आम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचंच उत्तर प्रभाकर कोलते यांच्या या लेखात मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
जरुर वाचा. पण त्या आधी अंक बुक करायला विसरु नका.
http://chinha.in/english/booknow.php
या लिंकवर. इथंच भेटू. भेटतच राहू.
No comments:
Post a Comment