Friday, April 8, 2011

’नग्नता: चित्रातली आणि मनातली’




कलेमधली नग्नता पहाताना तुमच्या मनात संकोच असतो?
नग्नतेमधली कला तुम्ही फ़क्त चोरुनच न्याहाळता?
चित्रपर्द्शनामधे नग्न चित्रांच्या प्रतिमा भिंतीवरच्या कॅनव्हासवर लटकवलेल्या दिसल्या की तुम्ही न रेंगाळता पावलं उचलता? 
( आणि त्याच प्रदर्शनाचे कॅटलॉग्ज घरी नेऊन कोणी बघत नसताना पुन्हा पुन्हा पहाता?)
मध्यप्रदेशाची सहल सोबत वाढत्या वयांची मुलं आहेत म्हणून खजुराहोला न जाताच उरकता?
हुसेनच्या वादग्रस्त नग्न प्रतिमा, भूपेन खक्करची गे सिरीज, अकबर पदमसींच्या रिक्लायनिंग न्यूडसपासून ते संजीव खांडेकरांच्या टिट्स,क्लिट्स आणि एलेफन्ट्स डिक प्रदर्शनांच्या विरोधात संस्कृतीरक्षकांचा माध्यमांमधून होणारा आरडाओरडा, प्रदर्शने बंद पाडणे इत्यादी गोष्टींना तुम्ही मुक पाठिंबा दर्शवता?  
पिकासोचं ब्लू न्यूड, रोदॅचं द किस, रविवर्माची अनावृत्त मत्स्यगंधा, ठाकूरसिंगांचि ओलेती, शुभा गोखलेची देहस्पंद मालिका बघताना तुम्हाला त्या कलाकृतींमधली फक्त आणि फ़क्त नग्नताच आधी (आणि नंतरही) दिसू शकते? 


 तर कृपा करून उद्यापासून आम्ही इथं रोज जे पोस्ट करणार आहोत ते वाचू नका.

कारण उद्यापासून रोज इथे लिहिलं जाणार आहे  

’चिन्ह’च्या आगामी ’नग्नता: चित्रातली आणि मनातली’ या अंकाविषयी. 

अंकातल्या मजकूराविषयी, 
चित्रांविषयी, 
प्रकाशचित्रांविषयी, 
लेखकांविषयी 
चित्रकारांविषयी..... 

उद्यापासून रोज इथंच, याच ठिकाणी भेटू या!



शर्मिला फडके

2 comments: