Wednesday, April 20, 2011

न्यूड आणि ’न्यूड’ल्स!


आर्टस्कूलमधल्या त्या भव्य स्टुडिओवजा विशाल वर्गात ३०-४० विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर जेव्हा न्यूडस्टडी साठी म्हणून एखादी स्त्री विवस्त्र होऊन उभी ठाकते तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच मनात भाव-भावनांची, विचारांची विलक्षण चलबिचल सुरु होते. प्रत्यक्षात काहीच घडत नाही पण मनामनात विचारांची आवर्तनं फेर धरुन नाचू लागतात.



कुणाही प्रतिभावंत लेखकाला आव्हान देणारा हा खरा विषय, पण चार-आठ फुटकळ लेखांपलीकडे मराठीत या विषयाची दखल आजवर कुणी घेतलीच नाही. ७०च्या दशकात सत्यकथेत प्रसिद्ध झालेली उर्मिला सिरुरांची एक सुरेख कथा मात्र याला अपवाद ठरावी.

म्हणूनच ’चिन्ह’ला हा विषय आव्हानात्मक वाटला. ’नग्नता’ विशेषांकात तो आवर्जुन घ्यावासा वाटला. ’चिन्ह’नं लेखक म्हणून निवड केली ती ज्यानी जेजे मध्ये विद्यार्थ्यांना दीड-दोन दशकं ’न्यूड’ हा विषय शिकवला त्याच सुहास बहुळकरांची. बहुळकरांनाही हा विषय आवडला आणि प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी प्रदीर्घ-प्रदीर्घ लेख हातात ठेवला तोच हा लेख ’न्यूड’ल्स!

यात सारं काही आहे. यात इतिहास आहे, भूगोल आहे, गोष्टी आहेत, कथाही आहेत. वात्रटपणा आहे, वाह्यातपणा आहे. थोडासा चावटपणाही असेल. पण किस्से तर काही विचारुच नका... ते तुम्हाला अगदी खो-खो हसवतील. पोटदुखेपर्यंत हसवतील आणि हसवता हसवता कदाचित डोळ्याच्या कडा अलगद ओल्याही करुन टाकतील....

आपली प्रत आजच  या ठिकाणी नोंदवा.
हा अंक नंतर मिळणार नाही हे निश्चित समजा...
उद्याही आपण इथंच भेटू. भेटतच राहू.



5 comments:

  1. Nice & Intresting... Got all information except price on the link... please replt asap...

    ReplyDelete
  2. Rohan.. We have mentioned there-
    Printed Price of the issue- Rs.300/-
    Discounted price after advnce booking- Rs.250/-

    ReplyDelete
  3. शर्मिला मॅडम, न्यूड आणि न्युडल्स च्या काही प्रती अजून शिल्लक आहेत का? असल्यास मला सांगाल का ही परत कशी मागवायची.
    मुंबईतच असेल तर मी कुठून पिक अप करू शकतो का?
    जरूर कळवा.
    तुमची साईट खुपच चांगली आहे. चित्रकलेसाठी वाहिलेली अशी एकाच साईट असेल कदाचित. तुम्हाला यश लाभो.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  4. आशिष- मन:पूर्वक धन्यवाद! ’चिन्ह’चा हा अंक पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे. कृपया < http://chinha.in/english/booknow.php > या लिंकवर अंकाची नोंदणी करुन ठेवा. अंक आपल्याला घरपोच पाठवला जाईल. अंकासंबंधीत सर्व माहिती ’चिन्ह’च्या संकेतस्थळावर तसेच ’चिन्ह’च्या फ़ेसबुक अकाउन्टवरुन आपल्याला मिळू शकेल.
    ब्लॉगला भेट देऊन आवर्जून तो आवडल्याचे कळवल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. नियमित येत रहा.

    ReplyDelete
  5. हाय शर्मिला, मी घरात नसल्यामुळे घरी मागवणे जरा कठीण वाटतेय.शनिवार/ रविवारला घरी डिलीवरी होऊ शकेल का? आणि आता किती पैसे भरावी लागतील रु २७५ कि रु ३२५ /-
    जरा कळवाल का?

    ReplyDelete