चित्रकला विषयक पुस्तकांना सध्या बहराचे दिवस आले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. चित्रकलाविषयक जड, क्लिष्ट भाषेतली समिक्षा जरी अनेकदा डोक्यावरुनच जाणारी असली तरी चित्रकारांची चरित्रं, आत्मचरित्र, मनोगतं,चित्रकलेसंदर्भातले किस्से, कहाण्या वाचण्यात सर्वांनाच रस वाटत असतो हे 'चिन्ह'ला चित्रकलेशी थेट काहीही संबंध नसलेल्यांकडूनही जो प्रतिसाद मिळतो त्यावरुन अनेकदा सिद्ध झाले आहेच. आपल्याकडे चित्रकारांची आत्मचरित्रं हा प्रकार थोड्या अभावानेच आढळणारा. खरं तर चित्रकारांनी स्वतः लिहिलेल्या आत्मकथनात्मक पुस्तकांना त्यांच्या स्वतःच्या कलाविषयक जाणीवा उलगडून दाखवणारेच फक्त नव्हे तर त्या काळातल्या सर्वच समकालिन चित्रकलेविषयक काळाचा एक मोठा पट उलगडून दाखवू शकणारे संदर्भमूल्य असते. औंधच्या महाराजांनी म्हणजेच बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी लिहिलेलं आत्मचरित्र हे याचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण.
आधुनिक भारतीय चित्रकारितेची परंपरा पुढे नेताना अस्सल भारतीय मुळांमधे रुजलेली, स्वतःची एक अनोखी चित्रशैली जोपासलेले चित्रकार श्री. मनजित बावा यांचं 'इन ब्लॅक अॅन्ड व्हाईट' हे मुळ इंग्रजीतलं आत्मचरित्र मेनका प्रकाशनानं नुकतंच मराठीमधे अनुवाद करुन आणलं आहे. या पुस्तकाचा सुंदर परिचय चिन्मय दामले यांनी 'मायबोली' या संकेतस्थळावर करुन दिलेला नुकताच वाचनात आला. या आत्मचरित्रामधला काही भागही तिथं दिला आहे.
'चिन्ह'च्या वाचकांकरता त्याची ही लिंक
इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट - मनजीत बावा / इना पुरी
शर्मिला फडके
( 'चिन्ह'ला चित्रकलेशी थेट काहीही संबंध नसलेल्यांकडूनही जो प्रतिसाद मिळतो )
ReplyDeleteहे जरा खटकणार वाटते .कधीतरी संबध आला असेल ना. हा त्यांना चित्रकलेची तेवढी जाणीव नसेल पण चित्रकाराबद्दल आपुलकी किंवा आवड असेल.