Friday, June 3, 2011

हिंदू म्हणून घ्यायलाच लाज वाटतेआणि हे अगदी अलीकडेच आलेलं पत्र किंवा पोस्टकार्ड. या पत्रानंतर मात्र येणार्‍या पत्रांचा, इ-मेल्सचा, एसएमएसचा किंवा रात्रीअपरात्री येणार्‍या फोनकॉल्सचा ओघ जवळजवळ थांबलाय.
 अंकाच्या संपादनाचं काम ऐन भरात आलं असताना हे सारं घडलं किंवा घडत गेलं. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नव्हताच. फोन, एसएमएस, इ-मेल्स किंवा पत्रातून जी भाषा वापरली जात होती ती पाहता त्याकडे दुर्लक्ष करणंच खरं तर योग्य होतं. या सार्‍यांना उत्त्ार देत बसलो असतो तर त्यातच अडकून पडलो असतो आणि मुख्य कामाकडे काहीसं दुर्लक्षही झालं असतं. ते मला नको होतं.
 त्यामुळे झालं काय की तुमची प्रतिक्रिया का नाही ? तुमची प्रतिक्रिया काय ? याला उत्त्ार देणार का नाही ? अशा विचारणा सातत्यानं फोनवरून, इ-मेल्स मधून आणि प्रत्यक्ष भेटीतून होऊ लागल्या.
 ज्यांनी माझी पत्नी, माझ्या बहिणी, माझी वयोवृद्ध आई यांच्या विषयी अत्यंत गलिच्छ, अतिशय शिवराळ शब्द वापरण्यास मागेपुढं पाहिलं नाही, (ज्यांनी मला सुद्धा कधी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही मग माझी पत्नी, माझ्या बहिणी आणि आई यांना पाहणं तर दूरच राहीलं) आणि ही भाषा केली त्याला मी काय उत्त्ार द्यायला हवं होतं ? आणि मुख्य म्हणजे त्यात बहुसंख्य महिलाच होत्या. ज्या पद्धतीनं त्या बोलत होत्या ते सारंच भयानक होतं. (त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही पोलिसांकडे नोंदवले आहेत.) सतत आठ-दहा दिवस चाललेल्या त्या भयंकर मानसिक छळानंतर घडलं एवढंच की आता मला स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायलाच लाज वाटते, शरम वाटते, किळस वाटते.
 सांगायचं होतं ते एवढंच. बोलून दाखवण्यापेक्षा कृतीवरच भर द्यायला मला आवडतं. आणि ती कृती मी करून दाखवलीच आहे.

 : सतीश नाईक 

5 comments:

 1. aai bahinee vishayee ase bolane vait jaree asale taree husen yanee ekhadyachya bahineeche nude painting kadhale tar to bhau gapp raheel ? tumhee rahal?
  Dhanyavad !

  ReplyDelete
 2. "म्हणून घ्यायला लाज वाटते म्हणता ह्यातच तुमचे हिंदुत्व कमी पडते" तुम्ही स्वतःला काय म्हणून घ्यायचे ते अवश्य घ्या...
  शुभेच्छा।

  ReplyDelete
 3. sir
  tumachy dherya chi mi prashanasa karto
  tumhi je kam karta aha te kharech chan ahe
  nehami changalya kamat adthada tar yenarch na
  tasech ahe
  akhi adani lok astat jyana kaletale kahich kalat nahi. tyam ule jast tras karun ghenyat kahi ras nahi
  mal yeadhech mhanve lagte

  ReplyDelete
 4. nagnata visheshankavarun evdha gadarol karnyachi kahich garaj nahi. karan nagnata zakaychi mhatli tar aadhi apli hindu sanskritich zakavi lagel.

  ReplyDelete
 5. 'हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटते'
  चुकीचे विधान....
  हिंदू ,बौद्ध आणि जैन धर्मामुळे जेवढी कला निर्माण झाली तेवढी जगात कुठेच झाली नसेल. या धर्मांमध्ये असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्यामुळेच कलाकारवर बंधन नव्हते.
  मुळात सर्व साधू हे दिगंबर अवस्थेत फिरत होते, आहेत(नाग साधू), बाहुबलीचे शिल्प वस्त्रलांकृत दाखवता आले असते. या धर्माचा अभिमान असला पाहिजे.... (मुठभर लोक विरोध म्हणून असे पत्र पाठवतात..पण म्हणून धर्माबद्दल लाज कशाला वाटायला पाहिजे?)( या लोकांचा राग केवळ हुसेनवर होता कारण तो मुसलमान आहे म्हणून, परंतु मी एक जोगेन चौधरी यांनी काढलेले गणपतीचे चित्र पहिले होते त्यात गणपतीचे लिंग आणि वृषण दाखविले होते... रोज गणपतीची पूजा करणाऱ्याला ते किळसवाण वाटल असतं परंतु त्याच्या विरोधात कोणी ब्र काढणार नाही कारण ते हिंदू आहेत) परंतु हिंदूंनी विरोध केला म्हणून हिंदू असल्याची लाज वाटणे म्हणजे आपल्या धर्मावर श्रद्धा नसणे. अर्थात आपल्या धर्मात तुम्ही धर्म पाळा अथवा नका पाळू याचंही बंधन नाहीये इतर धर्माप्रमाणे.

  ReplyDelete