Tuesday, June 21, 2011

’चिन्ह’मधला लेख ’मटा’त.





जुलैच्या दुसर्‍या
आठवड्यात प्रसिद्ध होणार्‍या ’चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’
विशेषांकातील चित्रकार हुसेन यांच्यावरच्या चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या
विशेष लेखाचा काही भाग कालच्या ’महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला
आहे. तुम्ही तो वाचलात का?
होय, हाच तो लेख जो प्रसिद्ध करू नये म्हणून ’हिंदू जनजागृती’
समितीच्या काही कार्यकर्त्यांनी ’सनातन प्रभात’ नामक दैनिकात आणि ’हिंदू
जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ’चिन्ह’च्या संदर्भात अत्यंत खोटारडा आणि
खोडसाळ मजकूर छापून आणला, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरातून
’चिन्ह’ला दीडएकशे निषेध करणारे आणि शिवीगाळ करणारे फोन, सत्तर-ऐंशी शिवराळ
आणि गलिच्छ एस.एम.एस आणि सात-आठ घाणेरडी पोस्टकार्डस् (अर्थातच निनावी)
आली. (जिज्ञासूंना ’चिन्ह’च्या ब्लॉगवर हे सारंच वाचता येईल). त्याच
लेखातला काही भाग ’मटा’नं प्रसिद्ध केला आहे.

1 comment:

  1. या लफंग्याने आपला एक सिनेमा मुसलमानानी आक्षेप घेतला म्हणून प्रदर्शित केला नाही. यावरून त्याचे कलाप्रेम दिसून येते.

    ReplyDelete