मी पहिल्यांदा शुभा गोखलेच्या स्टुडिओत गेले होते तेव्हा जहांगीरमधे तिचं ’संवाद’ चित्रप्रदर्शन नुकतंच पाहीलं होतं. प्रदर्शनात तिच्याभोवती प्रेक्षकंची खूपच गर्दी होती त्यामुळे इच्छा असूनही भेटायचं राहून गेलं होतं.
शुभाची चित्रं या प्रदर्शनाआधीही पाहिली होती. तिच्या ‘क्वेस्ट’मधली अंधारात हात दुमडून, चेहर्यावर केसांचे कृष्णमेघ पांघरुन बसलेली नायिका, बाजूचे उलटे कॅनव्हास, पत्त्यांची पाने विखुरलेली,ग्रेसच्या ’सांजभयाच्या साजणी’ मधली तिची तैलचित्रं पहाताना ग्रेसच्या गूढ ओळी थोड्या सोप्या होऊन कळल्यासारख्या वाटल्या होत्या..
अर्थात ही गोष्ट गेल्या वर्षीच्या जानेवारीतली.
त्यावेळी तिचा स्टुडिओ मी पहिल्यांदा बघितला. मग हळू हळू आतल्या प्रदेशाची ओळख होत गेली.
शुभाचा स्टुडिओ दादरच्या गजबजलेल्या भर वस्तीत. पण कशी कोण जाणे, तिच्या स्टुडिओच्या दारात पोचेपर्यंत ती सगळी बाहेरची गडबड विरळ होत विरत जाते आणि पोचल्यावर फक्त शांतताच तेव्हढी शिल्लक रहाते.स्टुडिओच्या बाहेरच्या दरवाजाच्या भिंतिशेजारी हिरव्या-निळ्या अक्षरांत कोरलेलं असतं स्टुडिओचं नाव- गोंदणगाव.
तिच्या स्टुडिओबाहेरच्या फ़रसबंदीवर काही वाळकी पानं नेहमीच छानशा नक्षीदारपणे इथेतिथे उडत असतात. मला त्याची गंमत वाटते. मुद्दाम योजलेलं नेपथ्यही इतकं परफ़ेक्ट नसेल या विचाराने.
तिच्या स्टुडिओबाहेरच्या फ़रसबंदीवर काही वाळकी पानं नेहमीच छानशा नक्षीदारपणे इथेतिथे उडत असतात. मला त्याची गंमत वाटते. मुद्दाम योजलेलं नेपथ्यही इतकं परफ़ेक्ट नसेल या विचाराने.
त्या इतस्तत: उडणार्या वाळक्या पानांच्या मधोमध एक लहानसा, गोलाकार हौद आहे ज्यात कधीकाळी कमळं रुजवायचा एक प्रयत्न झाला होता.
आतमधे चित्रकाराच्या स्टुडिओत जसा असायला पाहीजे तसाच पसारा. भिंतीवर पेंटींग्ज, इझल, बैठं स्टूल, रंगांच्या ट्यूब्ज, ब्रश, पॅलेट्स आणि त्यामधे ती- चित्रकार जसा असायला हवा तशीच. संवेदनशील, आत्ममग्न आणि मनस्वी.
स्वत:च्या कामाबद्दलची आणि एकंदरच जगण्यातली तिची पॅशन ती बोलायला लागली की तिच्या प्रत्येक शब्दामधून आपल्यापर्यंत पोचते. तिची चित्र ती दाखवत असते आणि त्याबद्दल सांगत असते, तेव्हा आपल्याला जाणवत असतं तिचं आजही त्या चित्रांमधे विलक्षण गुंतलेलं असणं.
गेल्या वर्षीच्या जनेवारीत मी पाहीलेल्या तिच्या स्टुडिओत आणि आजच्या तिच्या स्टुडिओत खूपच फ़रक पडलेला आहे. स्टुडिओचं रिनोव्हेशन झालं आहे. गेल्या वर्षी तसं तिने सूतोवाच केलं होतंच त्यामुळे मला फ़ारसा धक्का बसत नाही पण तरी तिच्या स्टुडिओच्या अंतरंगातला बदललेला अवकाश मला काहीसा अस्वस्थ करुन जातो. काय काय हरवून गेलं नक्की या आशंकेनं.
स्टुडिओबाहेरचं ’गोंदणगाव’ नाव अजूनही तेच आहे पण आतल्या प्रदेशात भिंतींवर तिने स्वत:च्या हातानी लिहिलेल्या देखण्या, नाजूक कॅलिग्राफ़ीतल्या, ग्रेसच्या कवितांच्या ओळी आता नाहीत. भिंतीवरती लावलेल्या आधीच्या असंख्य रंगिबेरंगी फोटोंच्या गर्दीपैकी फक्त अमृता शेरगिलचे कृष्णधवल फोटो शिल्लक राहीले आहेत, भिंतीवरची तिने काढलेली पोर्ट्रेट्स, तिची देहस्पंद सिरिजमधली पेंटींग्ज, त्यातले कमळांचे, कोकिळेचे, चंद्रकोरीच्या गोंदणाचे मोटीफ़्स तेच आहेत.
स्टुडिओ आपल्यासोबतच बदलत रहातो, पुन्हा येशील तेव्हा हे बदललेलं असेल, कदाचित नसेलही असं ती गेल्या वेळी मी निघताना म्हणाली होती. काय काय बदललं नक्की, हे म्हणूनच मी बराच वेळ निरखत राहीले. आणि लक्षात आलं की मिटलं काहीच नव्हतं. फ़क्त नवा रंग चढला होता भिंतींवर.
शुभा गोखलेच्या स्टुडिओला मी दिलेल्या या वर्षभरानंतरच्या भेटीत आम्ही फ़क्त आणि फ़क्त तिच्या स्टुडिओबद्दलच बोलत होतो-
प्रश्नावलीतली सुसूत्रता जराही न सोडता शुभा सांगत गेली, मी ऐकत गेले.
द स्टुडिओ ग्रोज अलॉन्ग विथ मी..
शुभा गोखले
- कलाकाराचं आणि स्टुडिओचं व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा काही फ़ार वेगळं नसतं. कलाकारामधे होत जाणारे मानसिक बदल स्टुडिओतही प्रतिबिंबित होतातच कुठेतरी. स्टुडिओत पाय ठेवला की मी आपोआपच एका वेगळ्याच प्रदेशात पोचते. इथल्या अवकाशात फ़क्त ’मै और मेरी तनहाई’.. बरीच लोकं स्टुडिओत येऊन जातात, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा, वादविवाद, मतभेद होतात, सगळ्यात मी असते, पण लक्ष मात्र नेहमीच स्टुडिओच्या भिंतीवर लावलेल्या, किंवा इझलवर अपूर्ण असलेल्या चित्राकडेच असते! मी दागिने आणि पेंटींग्ज अशा दोन्ही गोष्टी याच स्टुडिओत करत असल्याने इथे येणारी लोकंही दोन प्रकारची असतात. त्यामुळे वेगवेगळे अनुभव येतात. बरेचदा दागिने घेणार्या बायकांना भिंतीवरच्या माझ्या पेंटींग्जकडे ढुंकूनही पहावेसे वाटत नाही, याचे आश्चर्य आणि वाईटही वाटते. पण मग एखादा कुरियर देणारा मुलगा "बाई, जरा चित्र बघू का? असं विचारतो आणि मग मनाला दिलासा मिळतो.
स्टुडिओ म्हणजे माझ्या दृष्टीने केवळ या भिंती किंवा आतली रचना नाही. माझा स्टुडिओ मला माझ्या एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे वाटतो, ज्याच्यासोबत मी सर्वात जास्त कम्फ़र्टेबल असते.
- १९८० साली मी जी.डी.आर्ट झाले असले तरी माझ्या चित्रांचं पहिलं स्वतंत्र प्रदर्शन भरवलं मी १९९५ साली. पूर्ण वेळ व्यावसायिक चित्रकारितेला सुरुवात खर्या अर्थाने तेव्हापासूनच झाली असं म्हणायला लागेल. अर्थात ’प्रोफ़ेशन’ पेक्षा ’पॅशन’ मला जास्त महत्वाची वाटते. It is a way of life for me. बाजारातील गणित कधी जमले नाही आणि हिशोबही कधी समजलेच नाहीत. चित्रं काढणे एवढाच ध्यास.
* या स्टुडिओत कधीपासून काम करते आहेस?
- सुरुवातीला चित्र घरीच काढत होते, त्या काळात, घरच्यांना पसार्याचा, रंगांच्या वासाचा त्रास होईल म्हणून गिल्टी वाटायचे. काम झाले की सर्व आवरुन साफ़सूफ़ करुन ठेवत असे. बिल्डिंगच्या कम्पाउन्डमधेच माझ्या नवर्याचे चार्टर्ड अकौन्टन्टचे ऑफ़िस होते. सुदैवाने त्या ऑफ़िसची जागा २००० साली रिकामी झाली, आणि ती जागा मला स्टुडिओ म्हणून वापरायला मिळाली. तेव्हापासून इथेच काम करत आहे.
* स्टुडिओचा अंतर्भाग कसा असावा याची काही योजना तुझ्या मनात होती का, की आत्ता आहे हे स्वरुप त्याला आपोआप येत गेले?
- स्टुडिओ म्हणून ही जागा वापरायला लागले तेव्हा जागेचा संपूर्ण कायापालट केला. करावाच लागला. नैसर्गिक प्रकाश मिळावा म्हणून खिडक्या मोठ्या केल्या, त्याच्या बाहेर झाडांच्या कुंड्या ठेवल्या. मधली भिंत पाडून एकच मोठी काम करण्यासाठी जागा तयार केली आणि आतल्या बाजूला एक चित्र ठेवण्यासाठी स्टोररुम केली. मुख्य म्हणजे सीएच्या ऑफ़िसातील फ़ाईल्स आणि टॅक्स बुक्स ठेवण्यासाठी जी कपाटे होती ती काढून भिंती चित्र लावण्यासाठी मोकळ्या केल्या. सांसरिक जबाबदार्या कमी झाल्या, आता इथे दिवसातील मोठा वेळ घालवू शकते.
माझं बहुतेक सगळंच काम ऑटोबायोग्राफ़िकल आहे. स्टुडिओचा ११ वर्षांच सहवास असल्याने मला आता लक्षात येऊ लागले आहे की माझ्यात झालेले बदल माझ्या चित्रांत होतात आणि मग स्टुडिओवर ते परावर्तीत होत रहातात. The studio grows along with me. माझे व्यक्तिमत्व आणि स्टुडिओचे व्यक्तिमत्व एकमेकांत नकळत मिसळत जाते. ’पपेट’ सिरिज मी घरी असताना रंगवत होते, दोर दुसर्यांच्या हातात असल्याचे प्रतिक त्या सिरिजमधे आपोआप गेले.
माझं बहुतेक सगळंच काम ऑटोबायोग्राफ़िकल आहे. स्टुडिओचा ११ वर्षांच सहवास असल्याने मला आता लक्षात येऊ लागले आहे की माझ्यात झालेले बदल माझ्या चित्रांत होतात आणि मग स्टुडिओवर ते परावर्तीत होत रहातात. The studio grows along with me. माझे व्यक्तिमत्व आणि स्टुडिओचे व्यक्तिमत्व एकमेकांत नकळत मिसळत जाते. ’पपेट’ सिरिज मी घरी असताना रंगवत होते, दोर दुसर्यांच्या हातात असल्याचे प्रतिक त्या सिरिजमधे आपोआप गेले.
त्यानंतरच्या ’देहस्पंद’ मालिकेच्या वेळी ग्रेस यांच्या कवितांच्या ओळी माझ्या फक्त चित्रातच नाही, तर स्टुडिओच्या भिंती, दारं, पडदे इथेही उमटत गेल्या. अंगणात पारिजात, चाफ़ा, औदुंबर होते.. नंतर हळू हळू कवितेचा फिजिकल प्रेझेन्स कमी होत गेला सगळ्यातूनच.
’पद्मिनी’ मालीकेच्या वेळेस मला ’कमळ’ या मोटिफ़चे जणू डोहाळेच लागले होते. त्यावेळी चित्रांत आणि माझ्या पेन्डन्ट्समधे ही कमळं आली. अंगणात एक छोटासा हौद करुन त्यात कमळं रुजविण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही. मनात कितीही आणलं तरी कुठेही कमळं उगवत नसतात हा धडाच मिळाला त्यातून.. त्यांना योग्य तो प्रकाशही लागतो. पण कमळं फुलवायची आशा सोडलेली नाही अजून..
सध्या ’संवाद’ मालीकेवर पुढे काम चालू आहे. आता स्टुडिओ खूपच समंजस वाटतो आहे. कधी कधी वाटतं हे माझ्याच मनाचे खेळ आहेत. एक अदृश्य, बदलत जाणारे, चैतन्य देणारे विश्व मी माझ्या भोवती कल्पनेतून निर्माण करत आहे का?
सध्या ’संवाद’ मालीकेवर पुढे काम चालू आहे. आता स्टुडिओ खूपच समंजस वाटतो आहे. कधी कधी वाटतं हे माझ्याच मनाचे खेळ आहेत. एक अदृश्य, बदलत जाणारे, चैतन्य देणारे विश्व मी माझ्या भोवती कल्पनेतून निर्माण करत आहे का?
सर्जनाची प्रक्रिया जटील आहे. अमुक एका गोष्टीमुळे तमुक एक चित्र घडत असतं असा आराखडा बनवता येत नाही, शास्त्रोक्त विश्लेषण देता येत नाही, देऊ नये कारण इथे लॉजिक नाही, मॅजिक आहे.
दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असून सुद्धा गल्लीत असल्याने, आणि तेही इमारतीच्या मागच्या बाजूला असल्याने रहदारीचा त्रास होत नाही. आजूबाजूला मोठी झाडं असल्याने खारी, पोपट, कोकिळा यांचा किलकिलाट असतो, बरेचदा रेडिओचा आवाज बंद करुन मी हेच ऐकत पेंटींग करते.
* तुझा कोणताही एक टिपिकल दिवस कसा असतो त्याचे वर्णन करशील का? कधी उठतेस? स्टुडिओत कधी येतेस? स्टुडिओत आल्यावर काही वेगळे कपडे अंगावर चढवले जातात का?
- मी पहाटे लवकर उठणा-या पंथातली आहे. सकाळी चालणे, योगासने, प्राणायाम हे रुटिन ठरलेले आहे. चित्र काढण्याच्या प्रक्रियेमधे मन, शरिर, आत्मा हे सर्वच गुंतलेले असल्याने त्या सर्वांना निरोगी ठेवणे गरजेचे वाटते. घरातली दैनंदिन कामे झाली की दुपारपासून स्टुडिओमधे येते. संसार आणि माझे काम यांची सांगड घालताना आजही तारेवरची कसरत वाटते, पण आपल्याला हा तोल सांभाळता येऊ शकतो हे समजल्यामुळे ते करण्यात एक थ्रिल वाटते.
स्टुडिओत आल्यावर मोकळेपणाने वावरता यावे म्हणून रंग लागलेलेच कपडे किंवा ऍप्रन घालते. पैठणीपेक्षा सुद्धा याच अवतारात मला खरीखुरी ’मी’ असल्यासारखे वाटते. :)
* स्टुडिओत काम करत असताना टीव्ही, संगीत वगैरे ऐकतेस का? असल्यास कोणतं? त्याचा काही परिणाम कामावर होतो असं वाटतं का?
- संगीत! माझा एकदम वीक पॉइन्ट. कोणंतही चांगलं संगीत. कोणताही चांगला गायक. एक दोन रंगांच्या ट्यूब्ज कमी असल्या तरी चालतील पण संगीत असल्याशिवाय चित्र काढायला मजा येत नाही. मात्र जे गाणं ऐकत असतो त्याच भावना कॅनव्हासवर उतरतात हे मात्र एक मिथ आहे असं मला वाटतं. कारण माझा अनुभव अगदी वेगळा आहे.
’मीरा’ सिरिज करत असताना मी फ़क्त तिचीच भजनं दोन वर्षं ऐकत होते हे खोटं आहे. कित्येकदा ’बिडी जलैले, जिगर से पिया’ सारखी गाणी एफ़एम वर ऐकताना ही चित्रं साकारली गेली. कारण ’चाला वाही देस’ हे आधीच केव्हातरी माझ्यात जिरले, मुरले होते. चित्रं काढत असताना खर्या अर्थाने त्यात शिरल्यावर मात्र मग शब्द ऐकू येईनासेच होतात. पण गाण्याची लय अंगात भिनत असते व त्याच तालावर हात कॅनव्हासवर फ़िरत असतो. वाचन करत असताना मात्र मला अशा त-हेने गाणी ऐकता येत नाहीत. टीव्ही चित्र काढत असताना चालू ठेवणे शक्यच नाही. दोन्ही व्हिज्युअल मिडियम असल्याने एका घरात नांदणं शक्य वाटत नाही.
* कोणते पेंट्स वापरतेस?
* पेंटींग टेबल आणि बाकी सामग्री काय आणि कशी जमवली? स्टुडिओतल्या बाकी रचनेबद्दल काही सांग.
- स्टुडिओ सुरु करताना एक छान इझल तयार करुन घेतले, उंची कमी-जास्त करता येईल असे स्टूल बनवून घेतले, आणि मोठं चित्र काढायचं असेल तेव्हा उभं रहाण्याकरता (माझं वजन पेलेल असा) चौरंग तयार करुन घेतला. एक चाकं लावलेलं चौकोनी टेबलही खास बनवून घेतले आहे ज्याला सर्व बाजूंनी कप्पे आणि एक खण आहे ज्यात मी रंग, ब्रश वगैरे ठेवू शकते. उत्स्फ़ुर्ततेवर माझा भरवसा आहे, त्यामुळे फ़ार जास्त ठरवून किंवा विचार करुन मी काम करु शकत नाही. याला शाप म्हणता येईल किंवा वरदानही. My paintings are patterns in chaos. खूप व्यवस्थित रंग, ब्रश ऍरेन्ज करुन ठेवून मला काम जमत नाही, पण कसे कुणास ठाऊक वेळेला हवा तोच ब्रश किंवा रंग नेमका हातात येईल याची खात्री वाटते.
स्टुडिओमधील नेपथ्याबद्दल बोलायचे तर इथे ’फ़िरता रंगमंच’ आहे. ह्या एकाच टेबलवर छान कलमकारीचा टेबलक्लॉथ अंथरला, वाफ़ाळता चहा, शेजारच्या मावशींकडचा वडापाव असला की मित्र-मैत्रिणींशी गप्पा रंगायला वेळ लागत नाही. नाटक, संगीत, साहित्य आणि अर्थातच चित्रकलेशी संबंधीत मित्र-मैत्रिणी नेहमीच या स्टुडिओत येत असतात. न ठरवताही. विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद घडतात. इथे आलं की आमची क्रिएटीव्ह बॅटरी रिचार्ज होते असं त्यातल्या बर्याच जणांचं म्हणणं असतं. मला पण हा संवाद फ़ार महत्वाचा वाटतो, त्यामुळे मी आणि माझा स्टुडिओ ’ताजा’ रहातो.
कलाविषयक आणि इतरही पुस्तकांचा भरपूर संग्रह इथे आहे. स्टुडिओतली माझी लाडकी जागा म्हणजे इथला दिवाण. त्यावर पडून वाचायला, नाहीतर गाणी ऐकत पडायला मला फार आवडते. बांबूच्या पडद्यातून चित्रांवर पडणा-या आणि बदलत जाणा-या सावल्या मी तासनतास बघत राहू शकते.
It is very relaxing and meditative. ...सगळं किती हेवा वाटण्यासारखं आहे ना?
स्टुडिओमधे काही समस्याच नाहीत असं मात्र नाही. तळमजल्यावर असल्याने पावसाळ्यात ओल येणे, त्यामुळे चित्रांना बुरशी येणे वगैरे प्रसंगांना तोंड द्यावे लागतेच, पण मी विचार करते, माणूस नाही का कधी कधी आजारी पडत? तसंच हे.
अर्थात हा सगळा झाला माझ्या बाहेरच्या स्टुडिओचा प्रदेश. माझ्या आतला स्टुडिओतला प्रदेश मात्र मला सतत अस्वस्थ, बेचैनच ठेवतो. आतील उर्जा कमी-जास्त होत असते. आशा-निराशेचा ऊन-पाऊस रंगत असतो. आतील स्टुडिओचे दरवाजे ’धडक’ मारुन उघडल्याशिवाय बाहेरच्या स्टुडिओत काहीच ’घडत’ नाही हे मात्र खरे.
* तुझ्या पेंटींगला, सर्जन-प्रक्रियेला मदत करु शकतील अशी काही खास, वैशिष्ट्यपूर्ण हत्यारे, उपकरणे?
- प्रत्येक कलाकाराला आपल्या सवयीचा ब्रश, पेन्टींग नाईफ़ जवळ लागतातच. ब्रश तर सगळ्यात जिव्हाळ्याचा. तो कितीही जुना झाला किंवा मोडला तरी पुन्हा पुन्हा चिकटवून तोच वापरला जातो. कारण त्याचे गुण, खोड्या पूर्ण माहितीच्या झालेल्या असतात. तो जरा जरी नजरेआड झाला तरी जीव घाबराघुबरा होतो.
- प्रत्येक कलाकाराला आपल्या सवयीचा ब्रश, पेन्टींग नाईफ़ जवळ लागतातच. ब्रश तर सगळ्यात जिव्हाळ्याचा. तो कितीही जुना झाला किंवा मोडला तरी पुन्हा पुन्हा चिकटवून तोच वापरला जातो. कारण त्याचे गुण, खोड्या पूर्ण माहितीच्या झालेल्या असतात. तो जरा जरी नजरेआड झाला तरी जीव घाबराघुबरा होतो.
* काही गोष्टी अशा आहेत का ज्यांना तुझ्या दृष्टीने महत्वाचा अर्थ आहे?
- इथे जमा झालेली प्रत्येकच वस्तू मला महत्वाची वाटते. एखादा चांगले पोत असणारा कागदाचा छोटा तुकडा, अभ्रकाचे तुकडे, शंख-शिंपले असं काहीही इथे जमा होतं, कधी कधी हे गोडाउन भरुन जातं. मनातलं गोडाउन नाही का अनेकदा आठवणींनी भरुन जातं, तसंच!. पण त्या सगळ्या आठवणी, वस्तू सुंदर असतात, त्यांना आपल्या दृष्टीने काही अर्थ असतो म्हणूनच त्या साठवून ठेवायचा ना? प्रतिभावंत कवी ग्रेस यांनी माझ्या स्टुडिओला भेट देणे आणि त्याला ’गोंदणगाव’ हे नाव देणे (दारावरील पाटीही त्यांनी त्यांच्या सुलेखनात लिहून तयार करुन घेतलेली आहे) हा मी माझा भाग्ययोग समजते, आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद हाही कायम जपून ठेवण्यासारखाच आहे.
* एका वेळी एकाच प्रोजेक्टवर काम चालू असतं की अनेक?
- एखाद्या विशिष्ट जागी बसून किंवा उभे राहून चित्र सुचले असते तर आयुष्य किती सोपे झाले असते. पण तसं होतं नाही म्हणून स्टुडिओभर सैरभैर हिंडत असते, कधी कुठलाच विचार न करता कोर्या कॅनव्हास समोर, किंवा माझ्या ’दिवाण-ए-खास’ वर बसून वरुन कुठूनतरी कोसळणार्या त्या सौदामिनीची प्रतिक्षा करत बसते.
* स्टुडिओची साफ़सफ़ाई, आवरणं इ. केव्हा, किती वेळा केलं जातं, त्याचा कामावर काही परिणाम होतो का?
- मी आधीच म्हटलय माझ्या पसार्यातही एक सुसूत्रता असते. मुद्दाम व्यवस्थित ठेवलं नाही तरी योग्य त्या वस्तू हव्या त्या वेळेला सापडतात. त्यामुळे खास काही आवराआवर सारखी करत नाही. मधून मधून सर्व पसारा आवरते म्हणजे पुन्हा पुन्हा नवा पसारा घालायला बरं. अर्थात बेसिक हायजिन म्हणून जी झाडपूस करायला लागते ती नक्कीच करते. कारण शेवटी ही जागा मला एखाद्या मंदिराइतकी पवित्र वाटते. अनेक वेळा संध्याकाळी धूप, उदबत्ती लावते, सुगंधी फ़ुले पण असतातच.
* चित्रांना नावे कशी सुचतात? स्टुडिओत सुचलेल्या चित्रांबद्दल, प्रयोगांबद्दल सांग.
- माझ्या प्रत्येक चित्राला वेगळं शीर्षक नसतं. ती एखाद्या मालिकेचा भाग असतात. बरेचदा मी मिनीफ़ॉर्मॅट्मधे काम करते, एकाच मूडच्या सात-आठ चित्रांचा संच असतो. वेगवेगळ्या माध्यमांमधून मी एकच विषय अनेक वर्षं एक्स्प्लोअर करुन पहाते. अगदी एकेका ’पर्वात’ मी अनेक वर्ष काम करते म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रयोगशिलता मला आवडते. योग्य माध्यमाचा शोध लागेपर्यंत मी प्रयत्न करत रहाते. अर्थात तंत्र चित्रापेक्षा मोठे होत नाहीये ना याची काळजी घेतेच. ’पपेट’ सिरिजवर मी जवळ जवळ आठ वर्षं काम केलं. तोच विषय कॅनव्हास, कागद यावर रंगवलाच, शिवाय ऍक्रिलिक शीटवर त्रिमितीचा प्रयोग केला, त्याकरता बॅकग्राउन्डवर क्लॉथ कोलाज लावलं होतं. त्यावर पडणा-या कळसूत्री बाहुल्यांच्या सावल्यांमुळे स्टेजचा परिणाम साधता आला. अशा वेगवेगळ्या प्रयोगांमुळे आठ वर्षांत एकही चित्रं कंटाळवाणं किंवा रिपिटीटीव्ह झालं नाही. विषय तोच असला तरी आशय बदलत गेला. ’माणूस हतबल असतो, दुसराच कुणीतरी त्याला दोर ओढून नाचवत असतो’ या विचारापासून ही मालिका सुरु होते आणि शेवटी ’दोर सर्वांनाच असतात, तर त्याला महत्व कशाला द्यायचे? त्या खेळियाला काय करायचे ते करु देत. आपण आपले काम करीत रहायचे’ इथपर्यंत ती येऊन संपते.
- माझ्या प्रत्येक चित्राला वेगळं शीर्षक नसतं. ती एखाद्या मालिकेचा भाग असतात. बरेचदा मी मिनीफ़ॉर्मॅट्मधे काम करते, एकाच मूडच्या सात-आठ चित्रांचा संच असतो. वेगवेगळ्या माध्यमांमधून मी एकच विषय अनेक वर्षं एक्स्प्लोअर करुन पहाते. अगदी एकेका ’पर्वात’ मी अनेक वर्ष काम करते म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रयोगशिलता मला आवडते. योग्य माध्यमाचा शोध लागेपर्यंत मी प्रयत्न करत रहाते. अर्थात तंत्र चित्रापेक्षा मोठे होत नाहीये ना याची काळजी घेतेच. ’पपेट’ सिरिजवर मी जवळ जवळ आठ वर्षं काम केलं. तोच विषय कॅनव्हास, कागद यावर रंगवलाच, शिवाय ऍक्रिलिक शीटवर त्रिमितीचा प्रयोग केला, त्याकरता बॅकग्राउन्डवर क्लॉथ कोलाज लावलं होतं. त्यावर पडणा-या कळसूत्री बाहुल्यांच्या सावल्यांमुळे स्टेजचा परिणाम साधता आला. अशा वेगवेगळ्या प्रयोगांमुळे आठ वर्षांत एकही चित्रं कंटाळवाणं किंवा रिपिटीटीव्ह झालं नाही. विषय तोच असला तरी आशय बदलत गेला. ’माणूस हतबल असतो, दुसराच कुणीतरी त्याला दोर ओढून नाचवत असतो’ या विचारापासून ही मालिका सुरु होते आणि शेवटी ’दोर सर्वांनाच असतात, तर त्याला महत्व कशाला द्यायचे? त्या खेळियाला काय करायचे ते करु देत. आपण आपले काम करीत रहायचे’ इथपर्यंत ती येऊन संपते.
"द क्वेस्ट- पॅटर्न इन केऑस" या शीर्षकाखाली ही चित्र प्रदर्शित झाली. स्त्री- विचार करणारी, वाट बघणारी अशी या चित्रांमधे यायला लागली.
पुन्हा फ़िगरेटीव्हकडे वळल्यावर, ऍनाटॉमीची ड्रॉईंग्ज आणि अभ्यास करताना न्यूड्स रंगविले, त्यासुमारास वाचलेल्या ग्रेसच्या कवितांचे, कबिराच्या दोह्यांच्या शब्दांचे गारुड माझ्या चित्रांवर होते. चित्रलिपी बनून त्या ओळी चित्रांमधे आल्या. ’देहस्पंद- द रिझोनन्स ऑफ़ दी बॉडी’ हे या मालिकेचे नाव होते. त्यातूनच पुढे स्त्रियांच्या वेगवेगळ्या भावावस्था रंगवायला सुरुवात झाली.
’नायिका’ नावाची ही मालिका. त्यावेळी ‘मीराबाई’ या सत्य आणि आभास अशा दोन पातळ्यांवर वावरणार्या स्त्रीकडे मी आकर्षित झाले. मीरेच्या कवितेतील लय आणि तिच्या पायाला असलेल्या भिंगरीच्या गिरकीमुळे चित्रातील रेषा पण लिरिकल होत गेली.’मीरा’ च्या चित्रांमधला कुसुंबी आणि भगवा.. दोन्ही रंगांचा वेध घेत गेले. किती सूक्ष्म छटेचा फ़रक. एक व्हायब्रंट, पॅशनेट प्रेमाचा रंग, दुसरा त्यागाचा भगवा. पण दोन्हींमधली भावनीक तीव्रता तशीच सारखी.
आसपास कमळं असणारी, अत्यंत तृप्त, समाधानी असणारी ’पद्मिनी’ ही माझी दुसरी नायिका. स्त्री-पुरुष संबंध, त्यातील मॅग्नेटिझम, एकाचवेळी शारिर आणि अशारिर पातळ्यांवर असणारे नाते मला पहिल्यापासून आकर्षित करते. ’पपेट’नंतर पुन्हा, आता चालू असलेल्या ’संवाद’ मधे या विषयाचा अंतर्भाव आहे. दृकभाषा बदललेली असली तरी दोन्हींचा गाभा एकच आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
* कोणी सहाय्यक आहे का?
- असिस्टन्ट्सचा प्रश्नच येत नाही, इथे मलाच जिथे काय व केव्हा करायचे हे कोडे असते, तिथे दुसर्याला काय सांगणार? चित्रांचे आकारही फार मोठे नसल्याने तशी गरज भासत नाही. शिवाय एकट्यानेच काम करायला मला जास्त आवडते. Also,I am very possessive about my work. दुसर्याने त्यावर काम केले तर चालत नाही. उद्या पिकासो किंवा माटिझ आला तरी त्याला दुसरा कॅनव्हास देऊन "बाबा रे, तु तुझे चित्र रंगव, मी माझे" असे मला म्हणावेसे वाटेल. I like to make my own mistakes and learn.
* दुसर्या चित्रकारासोबत कधी काम केले आहे का? केले असेल तर त्याचा परिणाम स्वत:च्या कामावर झालेला आढळून आला का?
- दोन-तीन वेळा प्रतिभावंतांबरोबर काम करण्याचा योग आला. बरेचदा इतर आर्टिस्ट्सच्या स्टुडिओत जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाची पद्धत बघून खूप शिकायला मिळते. स्वत:च्या कलाकृतीतील उणीवा आणि शक्तीस्थळे काय आहेत हे पडताळून पहाता आले. रियाझ कमी पडतो आहे हे जाणवून पुन्हा नव्या उत्साहाने काम करण्याची उर्जा मिळाली. पण कामावर प्रत्यक्ष परिणाम होऊ देण्याचे मात्र कटाक्षाने टाळले.
* तुझे स्वत;चे असे काही तत्व किंवा तत्वज्ञान आहे?
- चित्रकलेचं शिक्षण घेत असतानाच ठरवले होते की मोडके तोडके का होईना, पण मला माझ्याच भाषेत बोलायचे आहे. माझे चित्र अजून परिपक्व व्हावे यासाठी अथक मेहेनत करायची आहे आणि सतत नविन, चैतन्यमयी कलाकृती निर्माण करत रहायचे आहे. पळवाटा किंवा शॉर्टकट नको आहेत मला कारण मी माझा प्रवास एन्जॉय करते आहे. कुठेही पोचायची मला घाई नाही.
* स्ट्रगल करणार्या, शिकणार्या, नव्या चित्रकारांना काय सांगशील?
- प्रत्येक नव्या कॅनव्हासवर अजून मीच शिकत असते, तेव्हा इतरांना काय सांगणार? तरी पण थोडा अनुभव जमा झालेला आहे त्या जोरावर सांगते की मार्ग खडतर आहे, आयुष्यभर मेहनत करायची तयारी ठेवा. आर्ट मार्केट, कलेच्या व्यापारीकरणाला, त्यातील ग्लॅमरला किती बळी पडायचे याचे तारतम्य ठेवले पाहीजे. घर चालवण्यासाठी पैसे मिळवणे गरजेचे आहे हे मी मानते, पण त्यासाठी कलेत कुठेही क्रिएटीव्ह कॉम्प्रोमाइज करुन चालत नाही. पैसे मिळवण्यासाठी दुसरे कोणतेही नेक काम करा. माझ्या कॅनव्हास आणि रंगांसाठी मी ज्वेलरी करते याचा मला अभिमान आहे. स्वत:च्या कामाशी प्रामाणिक रहा. स्वत:चे कठोर क्रिटिक व्हा. स्वत:च्या कामाच्या फार काळ प्रेमात राहू नका. रसिकांपर्यंत पोचू शकलात तर आनंद आहेच. त्यांची शाबासकी मिळाली, त्यांनी चित्र विकत घेतली तर आनंद निश्चित द्विगुणित होतो, पण हे नाही मिळाले तरी हत्यारे खाली ठेवू नका,
“ तडपते दिल की सदा वो सुने या ना सुने, अपना तो फ़र्ज है के पुकारते रहे. “
“ तडपते दिल की सदा वो सुने या ना सुने, अपना तो फ़र्ज है के पुकारते रहे. “
===================================================
'शुभा गोखले' वेबसाईट
'शुभा गोखले' वेबसाईट
Khup chhan.. Keep up d good work
ReplyDeleteशर्मिलाताई तुमच्यामुळे हा प्रवास खूप छान झाला. शुभाताईंचे , " स्वत:च्या कामाशी प्रामाणिक रहा. स्वत:चे कठोर क्रिटिक व्हा. स्वत:च्या कामाच्या फार काळ प्रेमात राहू नका." बोल कानात घुमत रहातील असेच आहेत. त्यांच्या पेंटीग्स एव्हढीच त्यांची ज्वेलरीही महत्वाची त्याबाबत जरा अधिक विस्तृत चर्चा ऐकवली असतीत तर...!
ReplyDeletemassst
ReplyDeleteSamved
too good................
ReplyDeleteदेखणी शुभाताई,
ReplyDeleteवेळोवेळी स्वत:ला तपासत-समृध्द करत, सूर-शब्द... रेषा-रंग... ह्यांना कवेत घेत, कॅनव्हासवर उतरवत...
आपलीही दृष्टी-मन समृध्द करणारी शुभाताई....
चिन्ह आणि शर्मिला, मन:पूर्वक धन्यवाद!!!
'चिन्ह' मधील हे गोंदणगाव पाहाणे म्हणजे चैतन्यमई कलाकृती व त्याची अनुभूती देणाऱ्या शुभाताई व शर्मिलाताई यांचा शब्दांकनाचा प्रवासाने एका ध्यान मंदिराला भेट दिल्याची निरव शान्तता प्रचीतीस येते. शुभा ताईनी दिलेल्या संदेशातून जीवनाकडे पाहण्याचा एका कलाकाराचा दृष्टीकोन कसा असावा हे उमजते. .स्व शोध कसा घेता येतो याचे उत्तम उदाहरण मला दिसले. मन:पुर्वक धन्यवाद! चैतन्यमई कलाकृती अशाच पहावयास मिळोत ही शुभेच्छा!
ReplyDeleteशुभाताईंचे , व त्यांच्या पेंटिंग्जचे भरपूर फोटो दिल्यामुळे त्यांचे वेगवेगळॆ मूड्स दृष्टीस पडले, चित्रांमधलीही विविधता दिसली.आम्हां सामान्यजनांना चित्रकलेतलं शास्त्र फारसं कळत नाही. पण त्यांतील सौंदर्य मात्र जाणवलं . त्यांच्या ज्वेलरीचे आणखी थोडे फोटो द्यायला हवे होते असं मात्र वाटलं.
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. स्टुडिओ सिरिज वाचत रहा. काय हवय्/नकोय ते जरुर कळवत रहा.
ReplyDeleteशुभा गोखले बनवत असलेल्या दागिन्यांचा एकत्रित फोटो नव्याने वर टाकला आहे.
धन्यवाद!
Paintings barobar Marathi sahityachi prachand odh /awad hi aplya mulakhtichya language madhun veloveli prakarshane janvte.
ReplyDeletejar.. artist zala nasta tar sahitmadhe nakkich kahitari khuup chhan ani vegle vachayla milale aste. pn atta matra donhi goshti ekatra alyaahet ani tyacha ..dwiguneet anand amhi ghet ahot. Kharch ...aho khup nashibanech asaa kalecha aaswaad ghet tichi seva karayala milte, ani swatahachya masteet rahun ayushya jagayla milte. Amhala he sagle karaychi khup oddhh /Aawaad ahe , pn Kalyan varun sakali 09.07 chi lokal pakdun Dadarla yeun ratri 7 nantar kahi kamma nasel tr ghari jayla milte ani tyat sampurna diwas kasa nighun jato hech kalat nahi...khup awad ahe paintingchi pn.....
asude... amhi.. tumhi kelelya paintings vrach amcha ananda manto ...teva tumhi akhndpane he vrat karat rahal ....amchyasathi ....ase amhas watte..kadachit mi jast kahi bolo asen tr kshmaswa!!!!!...pn je manaat vichar ale te kasebase mandle....
thanks
Rajesh
wa manapasun sashalela ha sanvad avadala.
ReplyDeleteSai
Tadapate dil ki sada woh sune ya na sune, apana to farj hai ke pukarate rahe...! -Kalakarachya jaganyala karan dilat. Shabdateet dhanyawad.......-Veena Jamkar.
ReplyDeleteyou must get this translated in English, french & spanish, so people all over can read & react....
ReplyDeletewhat say?
neelu patekar
kharch shbd apure padtat
ReplyDeleteApratim!
ReplyDeleteYour words are so inspiring to me!
Having met you this morning, I can now put a face to this amazing artist, whom I had been following on the jewellery FB page.
Warm regards,
Sharmila Laghate