तो चित्रकार आहे.
सभासंमेलनाला क्वचितच दिसतो.
प्रदर्शनाच्या ओपनिंगला वगैरे क्वचितच जातो.
प्रदर्शनांनंतरच्या कॉकटेल पार्ट्यांना तर तो फिरकतही नाही.
त्यामुळे साहजिकच आहे की स्टाईल, भपका हा प्रकार त्याच्याकडे नाहीच.
त्यामुळे पेज३ वर त्याचे फोटो कधीच दिसत नाहीत.
पण तरी तो चित्रकार आहे.
कारण की तो चित्र काढतो.
आणि चित्रांखेरीज तो दुसरं काहीच काढू शकत नाही.
आणि त्याची ती चित्र सुद्धा तो स्वत:च्याच हातांनी काढतो.
बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळच्या त्याच्या स्टुडिओत तो सदैव
चित्रसाधनेत मग्न असतो.
त्याचं नाव प्रकाश.
आता या पुढे हे नाव तुमच्या लक्षात असू द्या.
त्याच्या
स्टुडिओची आणि अर्थातच त्याची ओळख तुम्हाला झाल्यावर तुम्ही त्याचे नाव विसरु
शकणारच नाही अर्थात.
शर्मिला फडके
लेख फार छान जमला आहे. विशेषत: ऍबस्ट्रॅक्ट पेंटींगवर सहज ओघवत्या शैलीत लिहीलेलं फार कमी वेळा वाचायला मिळतं.
ReplyDeleteजयंत गुणे.
९६१९०१६३८५