Thursday, May 5, 2011
Wednesday, May 4, 2011
पुढं काय?
’चिन्ह’च्या आगामी अंकाविषयीचं हे प्रसिध्दीपत्रक (१)
’चिन्ह’नं मुंबई पुण्याच्या सर्वच वर्तमानपत्रांना पाठवलं. त्या प्रसिध्दीपत्रकावरून दै. सकाळ (मुंबई)नं दि. ६ एप्रिल २०११ च्या अंकात हे
ठळक वृत्तं (२) प्रसिध्द केलं. त्यात प्रसिध्द केलेल्या ’चिन्ह’च्या दूरध्वनीमधला एक आकडा चुकीचा होता. त्यामुळे ’चिन्ह’कडे त्यातला एकही फोन आला नाही. पण ज्या व्यक्तीचा तो फोन क्रमांक निघाला त्याला मात्र. अंकाविषयी चौकशी करणारे ६०-७० फोन येऊन गेले. ’सकाळ’मध्ये प्रसिध्द झालेल्या त्या मोबाईलवर फोन केला तेव्हा हे सारं कळलं.
हाती आलं. त्या पत्रापाठोपाठ फोन. फोनवर फोन. कटाळून फोन नाही घेतले तर एस एम एसवर एस एम एस, तेही कमी पडलेत म्हणून की काय मेलवर मेल्स आले. मेलबॉक्स अगदी भरून गेला तुडुंब......
Sunday, April 24, 2011
ओलेती ते सरस्वती.....

१९२६ साली 'रत्नाकर' मासिकाच्या मुखपृष्ठावर ठाकुरसिंगांचे 'ओलेती' हे चित्र झळकले आणि समाजात खळबळ माजली. वादांचा गदारोळ माजला. चित्राच्या अश्लिलतेविरोधात न्यायालयात खटले दाखल केले गेले. आज नव्या सहस्त्रकातही कलेतल्या श्लिल-अश्लिल वादाला उत्तर मिळालेले नाही. आजही न्यायालयात असे अनेक खटले दाखल होत रहातात. 'ओलेती'च्या जागी आता 'सरस्वती' असते. शिवाय वाद केवळ श्लिल-अश्लिलतेपुरताच मर्यादित रहात नाही तर त्याला जातीयतेचे, धार्मिकतेचे अनेक कंगोरे फुटतात. चित्रकारावर देशातून परागंदा व्हायची वेळ येते.
चित्रकार हुसेन यांनी हिंदूंच्या देव देवतांचं केलेलं चित्रण अश्लिल आहे काय?
हुसेन यांना असं चित्रण करण्याचा अधिकार कोणी दिला?
हुसेन हे हिंदूव्देष्टे आहेत काय?
अश्लिलता म्हणजे तरी नेमकं काय?
अर्वाचीन - प्राचीन काळात देवालयं, गुंफा, लेण्यांमध्ये जे चित्रण झालं ते काय अश्लिल नव्हतं?
मग त्याला काय म्हणायचं?
एक ना दोन, नाना प्रश्न प्रत्येकालाच पदोपदी सतावत असतात.
पण त्या प्रश्नांची उत्तर प्रत्येकाला मिळवता येतातच असं नाही.
किंवा मिळालेली उत्तर चूक का बरोबर ते ताडून पहावयासाठी जे करावं लागतं ते प्रत्येकापाशी असतंच असं नाही.
विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत यांचं मात्र तसं नसतं
किंबहुना तेच तर वेळोवेळी समाजाला दिशा देत असतात. विचार देत असतात, मार्ग दाखवत असतात. म्हणूनच मग आम्ही ठरवलं. त्यांनाच सारंच्या सारं विचारायचं.
अनेकांनी विषयाचा आवाका पाहून नको नको म्हटलं.
ज्यांना थेट नाही असं म्हणता आलं त्यांनी टंगव टंगव टंगवलं.
पण ज्यांनी होकार दिला त्यांनी मात्र संपूर्ण सहकार्य दिलं.
त्यातूनच साकार झाला एक परिसंवाद.’’नग्नता :चित्रातली आणि मनातली व कलावंतांचं स्वातंत्र्य’’
ज्यात सहभागी झाले आहेत
चित्रकार अकबर पदमसी, सुधीर पटवर्धन, संजीव खांडेकर, साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, प्रतिभा रानडे, कविता महाजन, नृत्यांगना पार्वती दत्ता, मनोविकारतज्ज्ञ व लेखक डॉ आनंद नाडकर्णी आणि सेक्सॉलॉजीस्ट डॉ. प्रकाश कोठारी.
चित्रकार हुसेन यांनी हिंदूंच्या देव देवतांचं केलेलं चित्रण अश्लिल आहे काय?
हुसेन यांना असं चित्रण करण्याचा अधिकार कोणी दिला?
हुसेन हे हिंदूव्देष्टे आहेत काय?
अश्लिलता म्हणजे तरी नेमकं काय?
अर्वाचीन - प्राचीन काळात देवालयं, गुंफा, लेण्यांमध्ये जे चित्रण झालं ते काय अश्लिल नव्हतं?
मग त्याला काय म्हणायचं?
एक ना दोन, नाना प्रश्न प्रत्येकालाच पदोपदी सतावत असतात.
पण त्या प्रश्नांची उत्तर प्रत्येकाला मिळवता येतातच असं नाही.
किंवा मिळालेली उत्तर चूक का बरोबर ते ताडून पहावयासाठी जे करावं लागतं ते प्रत्येकापाशी असतंच असं नाही.
विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत यांचं मात्र तसं नसतं
किंबहुना तेच तर वेळोवेळी समाजाला दिशा देत असतात. विचार देत असतात, मार्ग दाखवत असतात. म्हणूनच मग आम्ही ठरवलं. त्यांनाच सारंच्या सारं विचारायचं.
अनेकांनी विषयाचा आवाका पाहून नको नको म्हटलं.
ज्यांना थेट नाही असं म्हणता आलं त्यांनी टंगव टंगव टंगवलं.
पण ज्यांनी होकार दिला त्यांनी मात्र संपूर्ण सहकार्य दिलं.
त्यातूनच साकार झाला एक परिसंवाद.’’नग्नता :चित्रातली आणि मनातली व कलावंतांचं स्वातंत्र्य’’
ज्यात सहभागी झाले आहेत
चित्रकार अकबर पदमसी, सुधीर पटवर्धन, संजीव खांडेकर, साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, प्रतिभा रानडे, कविता महाजन, नृत्यांगना पार्वती दत्ता, मनोविकारतज्ज्ञ व लेखक डॉ आनंद नाडकर्णी आणि सेक्सॉलॉजीस्ट डॉ. प्रकाश कोठारी.
पण त्या आधी अंक बुक करायला विसरु नका.
http://chinha.in/english/booknow.php या लिंकवर.
पुन्हा इथंच भेटू.
भेटतच राहू.
शर्मिला फडके
http://chinha.in/english/booknow.php या लिंकवर.
पुन्हा इथंच भेटू.
भेटतच राहू.
शर्मिला फडके
Friday, April 22, 2011
१९६९ ते २०११
’महाराष्ट्र टाईम्स’च्या दि.२८ मार्च १९६९च्या अंकात आजचे नामवंत चित्रकार प्रभाकर कोलते यांनी प्रख्यात चित्रकार एम.एफ़.हुसेन यांच्या जहांगीर आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनावर अत्यंत परखड टीका करणारं एक लेखन केलं, ते वाचून हुसेन संतापले. त्यांनी थेट संपादकांकडेच तक्रार केली. संपादक म्हणजे कोण तर ... गोविंदराव तळवलकर. दुस-या दिवसापास्न कोलते यांचं मटामधलं सदर लेखन अर्थातच थांबलं, हे वेगळं सांगायला नकोच.
तेच प्रभाकर कोलते हे आज भारतातले एक ख्यातनाम कलाकार म्हणून ओळखले जातात. आणि आज २०११ साली, म्हणजे तब्बल ४२ वर्षांनंतर त्याच हुसेन यांनी त्यांच्या वरच्या इंग्रजी पुस्तकासाठी प्रकाशकाला लेखक म्हणून प्रभाकर कोलते यांचंच नाव सुचवलं आहे. आहे की नाही गंमत!
नुकतंच कोलते यांनी ते पुस्तक लिहून हातावेगळंही केलंय. म्हणूनच ’चिन्ह’नं कोलते यांना बोलतं करायचं ठरवलं. त्यात आणखीही दोन-तीन हेतू होते.
एक: त्या पुस्तकात काय आहे हे समजून घ्यायचं होतं. दोन: हुसेन यांच्या आजवरच्या कला कारकीर्दीकडे कोलते कसं पहातात? ते जाणून घ्यायचं होतं. आणि तीन: हुसेन यांना भारतातून परांगदा व्हावं लागलं या घटनेकडे ते कसं पहातात? चित्रकार कसं पहातात? सारं कलावर्तुळ कसं पहातं? हे ही उमजून घ्यायचं होतं.
हुसेन यांच्या संदर्भात तुम्हा आम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचंच उत्तर प्रभाकर कोलते यांच्या या लेखात मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
जरुर वाचा. पण त्या आधी अंक बुक करायला विसरु नका.
http://chinha.in/english/booknow.php
या लिंकवर. इथंच भेटू. भेटतच राहू.
Wednesday, April 20, 2011
न्यूड आणि ’न्यूड’ल्स!
आर्टस्कूलमधल्या त्या भव्य स्टुडिओवजा विशाल वर्गात ३०-४० विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर जेव्हा न्यूडस्टडी साठी म्हणून एखादी स्त्री विवस्त्र होऊन उभी ठाकते तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच मनात भाव-भावनांची, विचारांची विलक्षण चलबिचल सुरु होते. प्रत्यक्षात काहीच घडत नाही पण मनामनात विचारांची आवर्तनं फेर धरुन नाचू लागतात.
कुणाही प्रतिभावंत लेखकाला आव्हान देणारा हा खरा विषय, पण चार-आठ फुटकळ लेखांपलीकडे मराठीत या विषयाची दखल आजवर कुणी घेतलीच नाही. ७०च्या दशकात सत्यकथेत प्रसिद्ध झालेली उर्मिला सिरुरांची एक सुरेख कथा मात्र याला अपवाद ठरावी.
म्हणूनच ’चिन्ह’ला हा विषय आव्हानात्मक वाटला. ’नग्नता’ विशेषांकात तो आवर्जुन घ्यावासा वाटला. ’चिन्ह’नं लेखक म्हणून निवड केली ती ज्यानी जेजे मध्ये विद्यार्थ्यांना दीड-दोन दशकं ’न्यूड’ हा विषय शिकवला त्याच सुहास बहुळकरांची. बहुळकरांनाही हा विषय आवडला आणि प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी प्रदीर्घ-प्रदीर्घ लेख हातात ठेवला तोच हा लेख ’न्यूड’ल्स!
यात सारं काही आहे. यात इतिहास आहे, भूगोल आहे, गोष्टी आहेत, कथाही आहेत. वात्रटपणा आहे, वाह्यातपणा आहे. थोडासा चावटपणाही असेल. पण किस्से तर काही विचारुच नका... ते तुम्हाला अगदी खो-खो हसवतील. पोटदुखेपर्यंत हसवतील आणि हसवता हसवता कदाचित डोळ्याच्या कडा अलगद ओल्याही करुन टाकतील....
आपली प्रत आजच या ठिकाणी नोंदवा.
हा अंक नंतर मिळणार नाही हे निश्चित समजा...
उद्याही आपण इथंच भेटू. भेटतच राहू.
Monday, April 11, 2011
एकाच अंकाला दोन मुखपृष्ठं?
“नग्नता: चित्रातली आणि मनातली” अंकावर ’न्यूड पेंटिंग’ छापायचं नाही असा निर्णय अगदी आधीच झाला होता. ते खूपच क्लिशे ठरलं असतं हे एक आणि अंकाची मुख्य स्टोरी परफॉर्मन्स-आर्टीस्ट 'मोनाली मेहेर’ची होती त्यामुळे तिला मुखपृष्ठावर घेणंच योग्य होतं. मोनालीच्या तब्बल ६० तास चाललेल्या प्रचंड इंटरेस्टींग मुलाखतीनं त्यावर मग शिक्कामोर्तबच झालं.
मुखपृष्ठासह फ़ेसबुकवर घोषणाही झाली.
त्याच संध्याकाळी चित्रकार दत्तात्रय पाडेकरांचा फोन आला आणि पाठोपाठ ’चिन्ह’च्या अंकासाठीचं अप्रतिम असं प्रकाशचित्रंही.
पाडेकरांचं मत होतं की हे प्रकाशचित्र अंकाच्या विषयाला अतिशय अनुरुप आहे.
ते प्रकाशचित्र पाहिलं. पाडेकरांचं म्हणणं खरंच होतं.
’चिन्ह’च्या या अंकावर हेच मुखपृष्ठ असायला हवं होतं.
पण ’फ़ेसबुक’वर तर मोनालीचं मुखपृष्ठ झळकत होतं.
आता काय करायचं? प्रश्न पडला.
ते प्रकाशचित्र खरोखरच केवळ अप्रतिम होतं, + न्यूड चित्राची ती भिंतीवर टांगलेली डेकोरेटीव्ह नक्षी असलेली सोनेरी फ़्रेम. त्या फ़्रेमच्या काचेत समोरच्या भिंतीचं पडलेलं प्रतिबिंब आणि त्या फ़्रेम्सच्या वरच्या भागात बसलेले ते तीन रंगीबेरंगी गोड आणि अतिशय सुंदर असे पक्षी. त्यातला एक तर अत्यंत वात्रट, काचेतल्या न्यूडकडे अगदी डोळे फ़ाडफ़ाडून पाहतोय की काय असं वाटायला लावणारा... अंकाचा आशय, अंकाची संकल्पना, अंकाचं मध्यवर्ती सूत्र पुढं आणणारा...
अंकाला हेच मुखपृष्ठ योग्य आहे याची खात्री पटली. पण मग मोनालीच्या मुखपृष्ठाचं काय? तिची स्टोरीही तेव्हढीच महत्वाची होती. ’चिन्ह’ची मूळ विचारधारा स्पष्ट करणारी.
पण आता तर मोनालीचं मुखपृष्ठ आपण जाहीर करुनही बसलोय.
आणि मग निर्णय आला..
या अंकाला दोन दोन मुखपृष्ठ असतील
एक दत्तात्रय पाडेकरांच्या संकल्पनेतून किंवा कॅमे-यातून साकार झालेलं तर दुसरं ’मोनाली’च्या टेट म्युझियम'मधल्या परफ़ॉर्मन्सचं.
आणि मुखपृष्ठाची संकल्पना साकार करताना मग दुसरीही एक व्यवस्था करता आली. ती म्हणजे-
ज्याला पाडेकरांचं मुखपृष्ठ आवडेल त्याला ते अंकावर ठेवता येईल ज्याला त्यातली नग्नता खटकेल त्यांना मोनालीचं मुखपृष्ठ वर आणता येईल.
कशीय कल्पना?
Friday, April 8, 2011
’नग्नता: चित्रातली आणि मनातली’
कलेमधली नग्नता पहाताना तुमच्या मनात संकोच असतो?
नग्नतेमधली कला तुम्ही फ़क्त चोरुनच न्याहाळता?
चित्रपर्द्शनामधे नग्न चित्रांच्या प्रतिमा भिंतीवरच्या कॅनव्हासवर लटकवलेल्या दिसल्या की तुम्ही न रेंगाळता पावलं उचलता?
( आणि त्याच प्रदर्शनाचे कॅटलॉग्ज घरी नेऊन कोणी बघत नसताना पुन्हा पुन्हा पहाता?)
मध्यप्रदेशाची सहल सोबत वाढत्या वयांची मुलं आहेत म्हणून खजुराहोला न जाताच उरकता?
हुसेनच्या वादग्रस्त नग्न प्रतिमा, भूपेन खक्करची गे सिरीज, अकबर पदमसींच्या रिक्लायनिंग न्यूडसपासून ते संजीव खांडेकरांच्या टिट्स,क्लिट्स आणि एलेफन्ट्स डिक प्रदर्शनांच्या विरोधात संस्कृतीरक्षकांचा माध्यमांमधून होणारा आरडाओरडा, प्रदर्शने बंद पाडणे इत्यादी गोष्टींना तुम्ही मुक पाठिंबा दर्शवता?
पिकासोचं ब्लू न्यूड, रोदॅचं द किस, रविवर्माची अनावृत्त मत्स्यगंधा, ठाकूरसिंगांचि ओलेती, शुभा गोखलेची देहस्पंद मालिका बघताना तुम्हाला त्या कलाकृतींमधली फक्त आणि फ़क्त नग्नताच आधी (आणि नंतरही) दिसू शकते?
तर कृपा करून उद्यापासून आम्ही इथं रोज जे पोस्ट करणार आहोत ते वाचू नका.
कारण उद्यापासून रोज इथे लिहिलं जाणार आहे
’चिन्ह’च्या आगामी ’नग्नता: चित्रातली आणि मनातली’ या अंकाविषयी.
अंकातल्या मजकूराविषयी,
चित्रांविषयी,
प्रकाशचित्रांविषयी,
लेखकांविषयी
चित्रकारांविषयी.....
उद्यापासून रोज इथंच, याच ठिकाणी भेटू या!
शर्मिला फडके
Subscribe to:
Posts (Atom)









