कोण ही ‘मधुरा’?
‘मधुरा पेंडसे’ नावाच्या एका चित्रकर्त्रीनं ‘चिन्ह टीम’ला एक मेल पाठवला. दुर्दैवानं संपूर्ण ‘चिन्ह टीम’ तेव्हा अंकाच्या धबडग्यात अडकली होती. मग तिनं आणखी एक मेल पाठवला.
त्या निमित्तानं......
‘मधुरा पेंडसे’ नावाच्या चित्रकर्त्रीचा एक मेल ‘चिन्ह’ला जेव्हा आला तेव्हाच हे नाव प्रथम ठाऊक झालं. त्यामुळे तिच्याशी बोलण्याचा किंवा तिला पाहिलं असण्याचा प्रश्नच येत नाही. १० जुलै रोजी तिनं पहिला मेल ‘चिन्ह’ला पाठवला. वाचून पहायलाही वेळ नव्हता कारण ‘चिन्ह’च्या ‘नग्नता’ अंकाचं काम त्यावेळी अगदी ऐन भरात आलं होतं. त्यावेळी अक्षरश: १८-१८ तास काम चालू असायचं. त्यात तिचा मेलही भला थोरला, त्यामुळे त्याकडं खरं सांगायचं तर दुर्लक्षच झालं. पण जाता जाता त्या पत्रातला आशय मात्र लक्षात राहून गेला होता. तिला पडलेले प्रश्न, ते मांडण्याची तिची पद्धत, काहीशी तिरकस शैली- हे आपसूक सारंच लक्षात राहिलं, पण मनात असूनही तिच्या मेलला उत्तर देता आलं नाही. २१ जुलै रोजी ‘चिन्ह’चा अंक प्रसिद्ध झाला. वाटलं होतं आता तरी तिच्या आणि मेलबॉक्समधल्या अनेक उत्तरं न दिलेल्या मेल्सना उत्तरं देता येतील. पण अंक प्रसिद्ध झाला अन् कुरियरच्या त्या भयंकर अनुभवातून जावं लागलं. अद्यापही त्यातून आम्ही स्वत:ला सावरू शकलेलो नाहीय. नक्की किती नुकसान झालं आहे याचाही अंदाज आम्ही अद्याप बांधू शकलेलो नाही. पण ते असो. हे सारं लिहायचं कारण असं की अंक प्रसिद्ध होताच १०-१२ दिवसात मधुराचा आणखी एक मेल आला. त्या मेल मध्ये तिनं ‘चिन्ह’चा ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांक ज्या कोरोगेटेड बॉक्समध्ये टाकून आम्ही वितरीत केला होता त्या बॉक्सच्या आतल्या भागात तिनं स्वत:चं चित्र, सेल्फ पोर्ट्रेट रेखाटलं होतं. ते सेल्फ पोर्ट्रेट विलक्षण सुरेख होतं. आता उत्सुकता चाळवली गेली. फेसबुकवर शोध घेतला तेव्हा ‘मधुरा पेंडसे’ अचानक सापडलीच. पण तिच्या प्रोफाईलमधली माहिती अपुरीच होती. त्यावरून ती कोण? काय करते? ती कुठली? कुठे शिकते? का शिक्षण पूर्ण झालंय याचा काहीच उलगडा झाला नाही. पण तिचं थोडसं काम आणि तिचे काही फोटोग्राफ्स मात्र पहायला मिळाले. त्या कामांमध्येही सेल्फ पोर्ट्रेट्स जरा अधिक पहायला मिळाली. त्यावरून असं लक्षात आलं की ती स्वत:ला अधिक प्रभावीपणे रेखाटण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न ती करू पहातेय. अंकाच्या कोरोगेटेड बॉक्सच्या आतल्या भागात तिनं जे ‘सेल्फ’ रेखाटलंय त्यावरून हे अधिक लक्षात येतं. आणि तिला पडलेल्या प्रश्नाचं गांभिर्यही अधिक अधोरेखित होतं म्हणून तिनं पाठवलेला पहिला मेल आणि ‘सेल्फ पोर्ट्रेट’चा दुसरा मेल दोन्ही या मजकूरासोबत देत आहोत. यावर अर्थातच चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. ज्यांना ब्लॉगवर टाईप करणं कठीण वाटतं त्यांनी मेल पाठवायला हरकत नाही. किंवा चक्क लिहून स्कॅन करून पाठवलं तरी चालेल. आम्ही ते ब्लॉगवर टाकू. ‘मधुरा पेंडसे’ हे आजच्या तरुणाईचं प्रतिक आहे. म्हणून तिला पडलेले प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं तिनं ते मांडले आहेत तेही महत्त्वाचंच आहे. ‘चिन्ह’ला तरी यापेक्षा दुसरं काय अधिक हवंय!
Dear chinha team,
MF Hussein or not nudity is a big hush hush!And I am glad you guys talked about it. I wish you all the best!!
long back a friend sent me a forward on m f husseins painting which was total bakwas ! I am sure you have received one of those..and as I see much more !
So I sent her this mail as reply... I was angry and disappointed at her for supporting such activity being an artist. I thought I shall share it with you guys.
Dear friend,
I was thinking of making a painting
made a few study drawings
but now no use. Must hide them all or just burn them!
In retrospection
the mail sent by you does have a justification
Now we know that our sentiments are offended by the artist.
now it occurs to me- I must be careful
I must have “The list”
The list of subjects, thoughts, beliefs, visions, ideas,
which will not offence hindus or muslims or any such religion
I also must know the list - which will please everybody’s hearts and souls
I surely need the courage to protect my self respect and clearly don’t want to be a coward hindu
Tell me what issues, subjects to paint about
tell me what will shock people and what will not.
Tell me if I draw a dancer will it hurt the one who is crippled
tell me how to reach every observers mind and make sure he/she is not hurt or offended
I shall certainly keep my beliefs aside for the very observer
I should certainly know each ones beliefs (people who may or may not see my works because one can never tell how and when I may or may not hurt somebody’s emotion)
I know you guys have achieved a greater understanding of art or at least its boundaries
The very important aspect of an art piece “the limitations”
forgive my innocence I was merely a fool to believe it had nun.
So I am no more feeling shy to ask your sincere help and all the others who have read and forwarded the mail is to please lets just not forward mails lets also find a solution on this very serious matter.
Please help
I don’t have a clue is to on what subject to make a painting
I will immediately forward the answers to my entire fellow artists so they understand the fundamentals of arts and abide by the rules and boundaries by the answers provided by you and friends who have given me a chance to this awakening
Help me with “The list” please
Madhura Pendse (10th July)
Dear Chinha team,
I received the magazine 2 days back
Congratulations and all the very best!
I feel inspired! This is how I used your packaging!
Madhura Pendse (15th
Aug
)ताजा कलम - चित्र काढायला ‘चिन्ह’चे कोरोगेटेड बॉक्स आवडले असतील तर ते तिला आणखी उपलब्ध करून द्यायची ‘चिन्ह’ची तयारी आहे. अट छोटीशी एकच. तिनं तिला हवी तीच चित्र त्यावर काढावीत. कसे?
‘चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांकासाठी कृपया ९००४० ३४९०३ या मोबाईल नंबर्सवर '1 m copy' एवढाच मेसेज स्वत:क्ष्या नाव-पत्त्यासह आणि (असल्यास इमेल आयडीसह) पाठवा. अंक आठवड्याभरात घरपोच होईल.
सवलत देणगीमूल्य रु.५६० फक्त. (कुरियरखर्चासह).
अंकाच्या अधिक माहितीसाठी www.chinha.in वर प्रोमो पहा.