Wednesday, July 27, 2011


हे तुम्हीच ठरवा!

हा अंक खाकी कागदाचं कव्हर घालून वाचायची आवश्यकता नाही.
हा अंक दुस-या कुठल्याही (विशेषतः धार्मिक) अंकात घालून
वाचण्याचीही आवश्यकता नाही.
हा अंक मुलाबाळांपासूनही लपवून ठेवण्याची गरज नाही.
हा अंक वाचून झाल्यावर कडीकुलुपात बंद करून
ठेवण्याचीही गरज नाही.
इतकंच नाही तर हा अंक
घरात टिपॉयवर उघडपणे ठेवायलाही काही हरकत नाही.

पण मग शेजा-यांनी, पाहुण्यांनी, नातेवाईकांनी जर तो
वाचायला मागितला आणि त्यांनी तो ढापलाच तर
त्याला आम्ही जबाबदार रहाणार नाही.

एवढं सगळं वाचल्यावर तुमची उत्सुकता
निश्चितच चाळवली असेल की
काय, असं काय आहे तरी काय या अंकात? असा प्रश्न
तुम्हाला निश्चितच पडला असेल.

म्हणून तर आम्ही ही लिंकच देतोय.
तिच्यावर क्लिक करा आणि
अंकाबद्दलचं तुमचं मत तुम्हीच ठरवा!
कसे?


Monday, July 25, 2011


एक अंक थेट भेट !

जहांगीर आर्ट गॅलरीच्या पाय-यांवर दोन आर्टिस्टांची
अचानक एकमेकांशी भेट झाली.
तर त्यातला पहिला आर्टिस्ट जो होता ना त्याने
दुस-या आर्टिस्टला आपल्या हातातला कोरोगेटेडचा
जाडा बॉक्स दाखवून काही तरी म्हटलं.
तर तो दुसरा आर्टिस्ट चक्क उलट पावली माघारी वळला
आणि फुटपाथ क्रॉस करून चर्चगेटच्या दिशेने
चालताच झाला...
तर आता सांगा
त्या पहिल्या आर्टिस्टने दुस-या आर्टिस्टला असं
काय म्हटलं असेल की जेणेकरून तो असा निघून जावा.
ओळखाऽ पाहूऽऽ
एकऽऽ
दोनऽऽऽ
तीऽनऽऽऽ
नाही ओळखलंत ना. आम्ही सांगतो
तो पहिला आर्टिस्ट दुस-या आर्टिस्टला हातातला
कोरोगेटेडचा बॉक्स दाखवून 
म्हणाला
"मेरे पास चिन्ह है, तेरे पास क्या है?"
..........................................................
..........................................................
हसा हसा पोट भरून हसा... किंवा धरून हसा
हाऽ पण एक सांगून ठेवतो

हेऽऽऽ
कौन है त्ये, कोन है त्ये. मी चिन्नचा
शिकुरीटीवाला सांगतोय
येऽऽ भूषन, येऽऽ दाढीवाल्याऽ घाई नगं करू!
माझं समद्यांकडं लक्ष हाय
ही पोष्ट वाचून ज्यानं ज्यानं
आपल्या आपल्या की बोर्डला
कॉमेंट टाकायला हात घातलाय त्यानं त्यानं तो
मागं घ्यावा, मला हिथनं समदं दिसतया.
आमच्या पोष्टमधल्या पीजेपेक्षा ब्येकार पीजे
ज्याच्याकडं आसल त्यानंच पोस्ट टाकायची
नाहीतर गपगुमान लाईक करून मोकळं
व्हायचं
कसं? हा हा हाऽऽऽऽऽ

आनीक येक सांगतो
अंकाची माह्यती हवी आसल तर
तर अंकाचा ट्रेलर बघाया
म्होरं दिलेल्या लिंकवर
क्लीक करायचं
कसं?

आनखी सांगतो तुमचा पीजे
आमच्या पीजेपेक्षा भारी निघाला
तर आमच्याकडून चिन्नचा एक अंक
येकदम फुकट मिळालाच म्हनून समजा.
आनि न्हाई मिळाला तर तुमीच आमाला
1 m copy  असा येसेमेश तुमच्या
नाव पत्त्यासह करायचा
आनि अंक घरी बोलवायचा.

Sunday, July 24, 2011

’’नग्नता : चित्रातली आणि मनातली’’- ’चिन्ह’ प्रसिद्ध झालाय!



 
होय ! अंक प्रसिद्ध झाला !
होय!
’चिन्ह’ प्रसिद्ध झालाय!
खरं वाटत नाहीये ना?
... पण ते खरचेय...
एक नाही दोन, तब्बल ११ महिने
या अंकानं ’चिन्ह टीम’ला गुंतवून ठेवलं होतं.
अंक नेहमी सारखा नव्हताच
विषय जरा अवघड तर होताच
पण त्या पेक्षाही नाजूक होता.
’’नग्नता : चित्रातली आणि मनातली’’
त्यामुळे खूप काळजी घेऊन काम करावं लागलं
सावधपणानं पावलं उचलावी लागली
प्रत्येक निर्णय कठोर निकषांवर पारखून घ्यावा लागला.
जरा जरी चूक झाली असती तर गहजब झाल्या
वाचून राहिला नसता...
हुसेन यांच्यावरच्या लेखांच्या नुसत्या उल्लेखानंच
जे घडलं ते खरं तर घडायला नको होतं.
आता तुम्हीच सांगा...
हुसेन यांच्यावरचा लेख ’चिन्ह’नं नाही छापायचा
तर कुणी छापायचा?
चित्रकलेच्या अंकात चित्रकाराचा लेख
नाही छापायचा तर कुणावरचा छापायचा?
आणि हे सारं ठरवायचं तरी कुणी?
म्हंजे कोण ठरवणार?
आणि आम्ही ते ऐकायचं? का बरं?
आम्ही आपलं काम पूर्ण केलंय
आम्ही आमच्या आतल्या आवाजालाच जागलो.
आज हा अंक आपल्यासमोर येतोय
आता तुम्हीच ठरवा
आम्ही केलं ते योग्य होतं की अयोग्य?



Monday, July 11, 2011