Thursday, June 23, 2011

कुमार केतकर यांच्या संपादकत्वाखाली औरंगाबादहून सुरु झालेल्या ’दिव्य मराठी’ या नव्या दैनिकाच्या ५ जूनच्या अंकात ’दिव्य मराठी’चे सहाय्यक संपादक सुनील कर्णिक यांनी ’चिन्ह’च्या आगामी ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विषयी जे लिहिले आहे ते जरुर वाचा!

Tuesday, June 21, 2011

’चिन्ह’मधला लेख ’मटा’त.





जुलैच्या दुसर्‍या
आठवड्यात प्रसिद्ध होणार्‍या ’चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’
विशेषांकातील चित्रकार हुसेन यांच्यावरच्या चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या
विशेष लेखाचा काही भाग कालच्या ’महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला
आहे. तुम्ही तो वाचलात का?
होय, हाच तो लेख जो प्रसिद्ध करू नये म्हणून ’हिंदू जनजागृती’
समितीच्या काही कार्यकर्त्यांनी ’सनातन प्रभात’ नामक दैनिकात आणि ’हिंदू
जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ’चिन्ह’च्या संदर्भात अत्यंत खोटारडा आणि
खोडसाळ मजकूर छापून आणला, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरातून
’चिन्ह’ला दीडएकशे निषेध करणारे आणि शिवीगाळ करणारे फोन, सत्तर-ऐंशी शिवराळ
आणि गलिच्छ एस.एम.एस आणि सात-आठ घाणेरडी पोस्टकार्डस् (अर्थातच निनावी)
आली. (जिज्ञासूंना ’चिन्ह’च्या ब्लॉगवर हे सारंच वाचता येईल). त्याच
लेखातला काही भाग ’मटा’नं प्रसिद्ध केला आहे.




जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात प्रसिद्ध होणार्‍या ’चिन्ह’च्या ’नग्नता :
चित्रातली 
आणि मनातली’ विशेषांकांतील ’चिन्ह’च्या कार्यकारी संपादक शर्मिला
फडके यांच्या अंकाची भूमिका विषद करून सांगणारा लेखातील काही भाग ’दै.
लोकमत’नं आपल्या ’मंथन’ या पुरवणीत प्रसिद्ध केला आहे. जरुर वाचा.


Thursday, June 9, 2011

Friday, June 3, 2011

हिंदू म्हणून घ्यायलाच लाज वाटते



आणि हे अगदी अलीकडेच आलेलं पत्र किंवा पोस्टकार्ड. या पत्रानंतर मात्र येणार्‍या पत्रांचा, इ-मेल्सचा, एसएमएसचा किंवा रात्रीअपरात्री येणार्‍या फोनकॉल्सचा ओघ जवळजवळ थांबलाय.
 अंकाच्या संपादनाचं काम ऐन भरात आलं असताना हे सारं घडलं किंवा घडत गेलं. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नव्हताच. फोन, एसएमएस, इ-मेल्स किंवा पत्रातून जी भाषा वापरली जात होती ती पाहता त्याकडे दुर्लक्ष करणंच खरं तर योग्य होतं. या सार्‍यांना उत्त्ार देत बसलो असतो तर त्यातच अडकून पडलो असतो आणि मुख्य कामाकडे काहीसं दुर्लक्षही झालं असतं. ते मला नको होतं.
 त्यामुळे झालं काय की तुमची प्रतिक्रिया का नाही ? तुमची प्रतिक्रिया काय ? याला उत्त्ार देणार का नाही ? अशा विचारणा सातत्यानं फोनवरून, इ-मेल्स मधून आणि प्रत्यक्ष भेटीतून होऊ लागल्या.
 ज्यांनी माझी पत्नी, माझ्या बहिणी, माझी वयोवृद्ध आई यांच्या विषयी अत्यंत गलिच्छ, अतिशय शिवराळ शब्द वापरण्यास मागेपुढं पाहिलं नाही, (ज्यांनी मला सुद्धा कधी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही मग माझी पत्नी, माझ्या बहिणी आणि आई यांना पाहणं तर दूरच राहीलं) आणि ही भाषा केली त्याला मी काय उत्त्ार द्यायला हवं होतं ? आणि मुख्य म्हणजे त्यात बहुसंख्य महिलाच होत्या. ज्या पद्धतीनं त्या बोलत होत्या ते सारंच भयानक होतं. (त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही पोलिसांकडे नोंदवले आहेत.) सतत आठ-दहा दिवस चाललेल्या त्या भयंकर मानसिक छळानंतर घडलं एवढंच की आता मला स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायलाच लाज वाटते, शरम वाटते, किळस वाटते.
 सांगायचं होतं ते एवढंच. बोलून दाखवण्यापेक्षा कृतीवरच भर द्यायला मला आवडतं. आणि ती कृती मी करून दाखवलीच आहे.

 : सतीश नाईक